शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

शिक्षकांना मिळणार ४० लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेने कर्ज मर्यादेत तब्बल १२ लाखांची वाढ केली असून सभासदांना आता ४० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेने कर्ज मर्यादेत तब्बल १२ लाखांची वाढ केली असून सभासदांना आता ४० लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. बँकेकडे पगार खाते असणाऱ्या अंगणवाडी सेविका व पेन्शनरना एक लाखापर्यंतचे कर्ज देण्यास सभेने मंजुरी दिली. भागभांडवलाची दर्शनी किंमत ५०० च्या पटीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्राथमिक शिक्षक बँकेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाइन झाली, अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब शिरगावे होते. बँकेच्या सभासदांसाठी २८ लाखांची कर्ज मर्यादा होती, त्यामध्ये वाढ करत ४० लाख केले. यामध्ये ३० लाख नियमित, ५ लाख आकस्मिक, २ लाख विशेष आकस्मिक, २ लाख मध्यम मुदत तर १ लाख सणासाठी कर्ज दिले जाणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस व पेन्शनरांना ‘ब’ वर्ग सभासद करून त्यांना एक लाखापर्यंत कर्ज देण्यास सभेने मान्यता दिली. सेवानिवृत्त माजी अध्यक्षांची थकबाकीचा मुद्दा उपस्थित करत शंकर पोवार यांनी बँकेचा खाते उताराच दाखवला. यावर, जुलैमध्ये संबंधित सभासदांनी पैसे भरल्याचे अध्यक्ष शिरगावे यांनी सांगितले. दोन मयत सभासदांच्या कुटुंबीयांना कर्जमाफीचा लाभ का दिला जात नाही? मयताच्या प्रकरणातही राजकारण करता का? अशी विचारणा प्रभाकर कमळकर यांनी केली.

शारदा वाडकर, सुनील मोरे, सुकुमार पाटील, शुभांगी पाटील, एम. बी. गुरव, गजानन पाटील, संजय कुर्डूकर, अर्जुन पाटील, रविकुमार पाटील आदींनी ऑनलाइन प्रश्न उपस्थित केले. बँकेचे संचालक शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष बाजीराव कांबळे यांनी स्वागत केले. अध्यक्ष अण्णासाहेब शिरगावे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चौगुले यांनी अहवाल वाचन केले. संस्थापक राव डी. आर. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तब्बल पाच तास ऑनलाइन सभा

शिक्षक बँकेची सभा म्हटले की गोंधळ ठरलेला असतो. मात्र ऑनलाइन सभा असल्याने या गोष्टींना मर्यादा आल्या असल्या तरी तब्बल पाच तास ऑनलाइन सभा चालली.

मयत सभासदांची ठेव, शेअर्स रक्कम परत करा

मयत सभासदाला कर्जमाफीचा लाभ देताना त्याची ठेव व शेअर्स रक्कम वजा केली जाते. हे चुकीचे असून ही रक्कम त्यांना परत करा, अशी मागणी शिक्षक समितीचे जोतीराम पाटील यांनी केली.

ऑनलाइन मतदानात सत्ताधारीच भारी

विषयपत्रिकेवरील १४ विषय मंजुरीसाठी उपस्थित सभासदांकडून मतदान घेतले. यामध्ये सगळेच विषय चारशेच्या फरकाने एकतर्फी मंजूर झाले.

बँक, घरासह गाड्यातूनच सहभाग

ऑनलाइन सभेसाठी काही सभासद बँकेच्या मुख्य कार्यालयात तर बहुतांशी जणांनी घरी बसूनच सभेत सहभाग घेतला. तर गणेशोत्सवाची सुटी असल्याने सहलीवर असलेले सभासद थेट गाड्यातूनच सहभागी झाले होते.

या झाल्या मागण्या :

लाभांश सक्षमीकरण निधीस वर्ग करा.

कर्जाचा व्याजदर ९ टक्के करा.

महिला शिक्षकांसाठी बँकेत निवासी सोय करावी.

एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

यांनी विचारले लेखी प्रश्न :

शिवाजी पाटील, मनोजकुमार रणदिवे, सर्जेराव सुतार, जगन्नाथ कांबळे, सुनील एडके, रविकुमार पाटील, शंकर पोवार, प्रकाश पाटील.