शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

शिक्षकांनी अंधश्रद्धा निर्मूलन करावे

By admin | Updated: April 25, 2016 00:52 IST

मुक्ता दाभोलकर : आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण; पानसरे-दाभोलकर यांच्या खुन्यांना प्रत्युत्तर देण्याची शिक्षकांत ताकद

कोल्हापूर : विद्यार्थी ज्या मानसिकतेतून शाळेत येतो, ते पाहता त्याला केवळ पुस्तकीज्ञान देऊन उपयोगी नाही. अभ्यासक्रमात अनेक जागा दडलेल्या आहेत, त्याचा शोध घेऊन शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले तर समाज परिवर्तनास वेळ लागणार नाही, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले. पानसरे-दाभोलकर यांच्या खुन्यांना प्रत्युत्तर देण्याची ताकद शिक्षकांच्या भूमिकेत असल्याने या विचाराचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी त्यांनी राहावे, असेही त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रविवारी आयोजित सावित्रीबाई फुले व महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी समितीच्या राज्य महिला आघाडी प्रमुख सुरेखा कदम होत्या. मूर्तिदान चळवळ कोल्हापुरातून उभी राहिली, ती राज्यभर नेण्याचे काम ‘अंनिस’ने केले असून, आता या विषयात लोकांमध्ये कमालीची जागृती झाल्याचे सांगत दाभोलकर म्हणाल्या, जगात सर्वांत प्रगत शिक्षण फिनलॅँडमध्ये मिळते, कारण तेथील सरकार प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व समानतेवर अधिक लक्ष देते. आपल्याकडे गुणवत्ता राखली जाते; पण त्यामध्ये समानता नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडल्या आहेत. जीवन विविधतेने भरलेले आहे, अंधश्रद्धा प्रत्येकाच्या वाट्याला येतात, ते पुस्तकात कोठेही प्रतिबिंबीत होणार नाही; पण शिक्षकांनी त्याचा शोध घेऊन त्याचे निर्मूलन करावे. अंधश्रद्धाबाबत वर्गात प्रयोग करा, त्याबद्दल लिहा, त्याला प्रसिद्ध देण्याचे काम ‘अंनिस’ करेल. जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असणारे शिक्षण आपण देतो का? शिक्षण हे वैयक्तिक उन्नतीचे साधन असले तरी केवळ आपल्या हक्कासाठी लढा न देता समाजातील जुनाट परंपरेबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करावे. विद्यार्थ्यांशी संवाद साधा, चाकोरीबाहेर जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षक समिती शिक्षकांसह पालक व समाजातील प्रश्न घेऊन लढत असून, हा वसा व वारसा शिक्षकांनी जोपासावा, असे आवाहन सुरेखा कदम यांनी केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगले, दीपाली भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस राजेश सोनपराते यांनी स्वागत, तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. ‘आयफेटो’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, उदय शिंदे, चंद्रकांत आणावकर, सुरेश कोळी, विष्णू जाधव, सुधाकर सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)