शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

शिक्षकांनी भ्रष्टाचार ठेचून काढणारी पिढी निर्माण करावी

By admin | Updated: May 13, 2015 00:47 IST

नाना पाटेकर : कालकुंद्री जिल्हा परिषद शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव

चंदगड : राजकारण आणि इतर क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अशा माणसांचा मला संताप येतो. भ्रष्टाचाऱ्यांना ठेचून मारणारी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य संस्काराची शिदोरी द्यावी, असे आवाहन सुप्रिसद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जि. प. प्राथमिक शाळेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुण्याचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागीय उपायुक्त इंद्रजित देशमुख उपस्थित होते.अनंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय बाळराम पाटील यांनी स्वागत केले. पाटेकर म्हणाले, स्वत:च्या अनेक विवंचना असतात. त्याबाहेर जाऊन सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे. दीडशे वर्षांपूर्वी इथल्या शिक्षणप्रेमींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा काढली आणि आजची उच्च शिक्षित पिढी त्यांच्या आशीर्वादाने निर्माण झाली. कालकुंद्री गावाने अनेक विद्याविभूषित रत्ने घडवली. या रत्नांचा हार गावाचा व परिसराचा विकास करण्यासाठी झटतो आहे. ही बाब अभिनंदनीय आहे. माझ्यावरही कोणतेही काम सोपवा, ते मी आनंदाने करीन.तरुणांना संदेश देताना नाना म्हणाले, खायला-प्यायला आपल्याला सगळे ताजे पाहिजे; पैसा मात्र शिळा चालतो. बापजाद्यांच्या शिळ्या कमाईवर विसंबून न राहता स्वत:ची कष्टाची भाकरी शोधा.यावेळी इंद्रजित भोसले म्हणाले, आयुष्यभर पुण्याईची उधळण करणाऱ्यांची जयंती साजरी होते. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आजच्या स्मृतिदिनी योगायोगाने शाळेला दीडशे वर्षे पूर्ण झाली हासुद्धा योगायोगच असल्याचे सांगितले. लाखो रुपये खर्च करून मनाच्या वेदना संपविता येत नाहीत. यावेळी गटशिक्षणाधिकारी एस. डी. डवरी, सुनील कुलकर्णी, संजय भोसले, एम. जे. पाटील, सुजाता पाटील, चंद्रकांत पाटील, एन. बी. हालबागोळ, वाय. आर. निट्टूरकर, आदी उपस्थित होते.