शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

शिक्षक भरतीचे अधिकार आयुक्तांना

By admin | Updated: August 11, 2014 21:59 IST

समिती गठीत : माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत नव्याने निर्णय

रत्नागिरी : प्राथमिक व माध्यमिक शिक्षक भरतीसाठीचे अधिकार शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समितीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर उच्च माध्यमिक शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नत्ती बाबतीतचे अधिकार विभागीय महसूल आयुक्तांना देण्यात आले. त्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापनाही केली आहे, याबाबतचा आदेश शासनाने नुकताच जाहीर केला आहे.शासकीय यंत्रणेमार्फत राज्यात सर्व शाळांतील पटपडताळणी केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी घातली होती. २० जून २०१४ च्या शासन निर्णयाव्दारे ही बंदी उठविली. यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक भरतीसाठी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. त्यामध्ये समाजकल्याण अधिकारी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य आणि प्राथमिकसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिकसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. यापूर्वी शिक्षक भरतीचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना होते. याबाबतचे त्यांचे अधिकार गोठविण्यात आले आहेत.प्राथमिक व माध्यमिकप्रमाणेच उच्च माध्यमिकसाठीही शासनाने १९ जुलै २०१४ च्या आदेशान्वये शिक्षक भरतीसाठी महसूल खात्याच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. शिक्षकांची मान्यता शिक्षण उपसंचालकांच्या सहीने होत होत्या. त्यामुळे सध्यातरी शिक्षण उपसंचालकांचे अधिकार गोठविल्याचे दिसत आहे.उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या परवानगीने होत होती. पण, आता पद भरतीसाठीच्या परवानगीपासून ते वैयक्तिक मान्यतेपर्यंतचे अधिकार महसूल विभागाच्या आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतची शिक्षक भरती किचकट ठरणार आहे. याबाबतचे अधिकार नव्याने देण्यात आल्यामुळे पुढे उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)