शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

Lok Sabha Election 2019 जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:06 IST

शिरोळ : देशात जातीच्या नावावर राजकारण सुरू असून, या देशाला पंतप्रधानाची गरज होती. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे चौकीदार निघाले. ...

शिरोळ : देशात जातीच्या नावावर राजकारण सुरू असून, या देशाला पंतप्रधानाची गरज होती. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे चौकीदार निघाले. या निवडणुकीला व्यवसाय बनवून ठेवला आहे. गेली पाच वर्षे जातीच्या नावावर समाजामध्ये फूट पाडली जात आहे. विकासाची कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे, असे आवाहन सिनेअभिनेते प्रकाश राज यांनी केले.महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथील आझाद मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. प्रकाश राज पुढे म्हणाले, जे चाळीस वीरजवान देशासाठी शहीद झाले, त्याचे पार्थिव हे ग्रामीण भागाकडे जात होते. त्यामुळे देश चालविणारा व रक्षण करणारा हा ग्रामीण भागातील शेतकरीच आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी हे रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.त्यामुळे शेतकºयांचा आवाज लोकसभेत उठविण्यासाठी अशा नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा लोकसभेत पाठवा. मी देखील लोकसभेत असणार आहे, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारच्या कारभारामुळे हा देश पिछाडीवर गेला असून कृषी, औद्योगिक, अंतर्गत सुरक्षा याचबरोबर आर्थिक संकटात सापडला आहे. सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेतूनच काम केल्यामुळे आजही लोक वर्गणीबरोबर मतेही देत आहेत. दिल्लीहून आदेश निघाला आहे. काहीही करा, पण हातकणंगले मतदारसंघ सोडू नका. मात्र, ही शेतकरी चळवळ आहे. सत्तेचा व पैशांचा गैरवापर करणाºयांना जनताच जागा दाखविणार आहे.---————————————————चौकट - माझीही जबाबदारी : राजमाझी आई नर्स होती. तिने मला घडविलं. या फिल्म इंडस्ट्रिजमध्ये आल्यानंतर माझ्याकडे १२० रुपये होते. आज माझ्याजवळ खूप पैसा आहे. लोकांच्या प्रेमामुळेच मी इतके यश मिळवू शकलो. ज्या लोकांमुळे मी व माझा परिवार आनंदी आहे, त्या लोकांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल. ती माझी जबाबदारी आहे, असे सांगून सिनेअभिनेते राज यांनी सभेला येण्याचा उद्देश विषद केला.लोकसभेची ही निवडणूक खासदार राजू शेट्टी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. माझ्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खोट्या अफवा पसरविल्या जात असून, मी शेवटपर्यंत राजू शेट्टी यांच्यासोबतच राहणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोदींच्या नावावर मते मागितली जात आहेत. त्यामुळे उमेदवाराचे कोणतेच कर्तृत्व नाही, हे सिद्ध होत आहे. जो सरकारच्या विरोधात बोलेल त्याची चौकशी लावण्याचे काम सुरू आहे. सत्ता व पैशांचा भाजप सरकारला माज आला असून, जनताच त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक