शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

तावडे हॉटेलप्रश्नी कायद्याची पायमल्ली : दिलीप देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:01 IST

कोल्हापूर : शासनाने निर्माण केलेले कायदे, प्रसिद्ध केलेली परिपत्रके यांची तावडे हॉटेल परिसरप्रश्नी शासनाकडूनच पायमल्ली होत असल्याचा आरोप करत कायदे पाळायचे नसतील

कोल्हापूर : शासनाने निर्माण केलेले कायदे, प्रसिद्ध केलेली परिपत्रके यांची तावडे हॉटेल परिसरप्रश्नी शासनाकडूनच पायमल्ली होत असल्याचा आरोप करत कायदे पाळायचे नसतील तर महापालिका बरखास्त करून सर्व कामकाज राज्य सरकारने पाहावे, असे आवाहन प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

देसाई म्हणाले, शहरात अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असताना तावडे हॉटेल परिसरातील धनदांडग्यांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामधारकांवर कायद्याने गुन्हे नोंदविणे क्रमप्राप्त असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नोटिसा रद्दबादल ठरवून बांधकामांना परवानगी देत आहेत. शासनानेच निर्माण केलेल्या कायद्यात शासन ढवळाढवळ करीत असेल तर महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी देसाई यांनी केले.वळवींच्या कार्यकाळातील सनदी रद्द करासेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांच्या सन २००४ ते २००८ या कार्यकाळातील किरकोळ अर्ज, औद्योगिक वापरास परवानगी, बिनशेती एस.आर. असे आदेश दिले; पण एकाच क्रमांकाचे दोन, एकाच गटाचे दोन आदेश अथवा खरी नक्कल असे खोटे शिक्के मारून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दस्त नोंदविण्यात आले. त्यामुळे या कालावधीतील दस्त नोंदवू नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तावडे हॉटेल परिसरात अनेक परवानग्याही त्यांनीच दिल्याचे निदर्शनास आले असल्याचे सांगून वळवी यांनी दिलेल्या सनदी रद्द कराव्यात, अशी मागणी देसाई यांनी केली.