शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तारकर्ली - पुणे एस. टी. बसफेरीला अखेर मुहूर्त

By admin | Updated: October 24, 2015 00:29 IST

स्थानिकांना होणार लाभ : तारकर्ली येथून दुपारी ३.३० वा. सुटणार, भाजपचा वर्षभर पाठपुरावा

मालवण : तारकर्ली देवबाग हे पर्यटनाचे हॉटस्पॉट आहे. दरवर्षी येणाऱ्या लाखो पर्यटकांत पुणे, कोल्हापूर येथील पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यामुळे तारकर्ली येथून पुणे एस. टी. बस सुरु करावी अशी तालुका भाजपची एस. टी. प्रशासनाकडे आग्रही मागणी होती. वर्षभर केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर तारकर्ली मालवण ते पुणे-निगडी या गाडीचा प्रारंभ भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी श्रीफळ वाढवून केला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.तारकर्ली येथून दुपारी ३.३० वाजता सुटणारी ही बस बाजारपेठमार्गे मालवण बसस्थानकात येणार आहे. त्यानंतर मालवण बसस्थानकातून कणकवली - कोल्हापूर मार्गे पुणे निगडी असा या गाडीचा मार्ग आहे. दररोज धावणाऱ्या या बसचा पर्यटकांसह प्रवासीवर्गाला फायदा होणार आहे. यावेळी मनोज मोंडकर, शहराध्यक्ष दादा वाघ, तारकर्ली सरपंच मोहन केळुसकर, गजानन ठाकूर, पूर्वा ठाकूर तसेच मालवण बसस्थानकाचे अधिकारी कुडपकर, आबा सामंत, चालक प्रशांत कवठकर, वाहक घुगे, भाजप पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाजपच्या मागणीला यशपुणे, कोल्हापूर येथून येणाऱ्या पर्यटकांना तारकर्ली देवबाग येथे जाण्यास थेट गाडी नव्हती. मालवणात उतरल्यानंतर रिक्षा, वा अन्य वाहनांचा वापर करावा लागत होता. खासगी वाहनांचे प्रवासी दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. तारकर्ली- पुणे अशी बस सोडावी अशी मागणी भाजपने वर्षभरापूर्वी केली होती. त्यानंतर सतत पाठपुरावा करून दसऱ्याच्या मुहूर्तावर या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. पर्यटकांनी तसेच देवबाग- तारकर्ली येथील ग्रामस्थांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबा मोंडकर यांनी केले आहे.