शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बटालियनच्या केंद्रासाठी तमदलगेकरांचा पुढाकार

By admin | Updated: January 29, 2016 00:37 IST

जागेचा प्रश्न : बांधकामास परवानगी देण्याचा ठराव

जयसिंगपूर : वनसंज्ञा रद्द करून भारत बटालियनला बांधकाम करण्याची परवानगी द्यावी, असा ठराव तमदलगे (ता. शिरोळ) येथे २६ जानेवारीच्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. ‘भारत राखीव बटालियन-३’च्या नावावर या ठिकाणी जमीन असून, वनसंज्ञा असे आरक्षण असल्यामुळे बांधकामास अडचणी येत होत्या. तमदलगेकरांनी पुढाकार घेऊन सभेत ठराव केल्यामुळे बटालियनच्या जागेचा प्रश्न निकालात निघण्याच्या मार्गावर असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात हा प्रश्न आहे.कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता ‘भारत राखीव बटालियन-३’ची शासनाने निर्मिती केली. परंतु, या बटालियनचा गेल्या पाच वर्षांपासून जागेअभावी मुक्काम दौंड (पुणे) येथे आहे. दरम्यान, रेंदाळ (ता. हातकणंलगे) येथील जागा मंजूर करण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र ते निष्फळ ठरले.प्रारंभी मजले (ता. हातकगणंले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करण्यात आली होती. सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ही जागा सध्या ‘भारत राखीव बटालियन-३’च्या नावावर आहे. परंतु, मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून, तमदलगे जागेत वनसंज्ञा लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचणी येत होत्या. मात्र, ग्रामसभेत तमदलगे गावाने भारत राखीव बटालियन क्र-३ च्या कोल्हापूर गट उभारणी करता देण्यात आलेल्या जमिनीवर वन आरक्षण काढून बांधकामास परवानगी द्यावी, असा ठराव मंजूर केला आहे. हा ठराव जिल्हाधिकारी अमित सैनी यांना पाठविण्यात आला आहे. ठरावामध्ये म्हटले आहे की, येथील गट क्र. २८ मधील २० हेक्टर जमीन वनक्षेत्रात आहे. ही जागा समादेशक, भारत राखीव बटालियन क्र. ३ यांच्या नावे सातबारा पत्रकी नोंद आहे. ही जागा प्रयोजनाकरिता देण्यात आली होती. या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी वनविभागाकडून रीतसर परवानगी घेऊन बटालियन गट उभारणी करण्यासाठी जमिनीवरील वनआरक्षण काढून त्या ठिकाणी बांधकामास हरकत नसल्याचे नमूद केले आहे. (प्रतिनिधी)२००७ सालापासून तमदलगे येथील जागा बटालियनच्या जागेवर असून, वनसंज्ञाच्या प्रश्नामुळे येथे बटालियन होण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, तमदलगे गावाने एक पाऊल पुढे येऊन बटालियनचे केंद्र उभारण्यासाठी ग्रामसभेत ठराव केला आहे. आता हा प्रश्न शासनाने लवकरात लवकर निकालात काढून या ठिकाणी बटालियन केंद्र स्थापन करावे.- सपना कांबळे, सरपंच, तमदलगेराज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण तळासाठी राधानगरी ग्रामपंचायत देणार ६० एकर जमीनदोन वर्षांपूर्वी हा प्रशिक्षण तळ मंजूर झाला आहे. यासाठी यापूर्वी तमदलगे, रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा पाहण्यात आल्या. मात्र, स्थानिकांनी त्याला विरोध केल्याने त्या बारगळल्या. त्यामुळे हा तळ अहमदनगर जिल्ह्यात हलविण्याच्या हालचाली अधिकारी पातळीवर सुरू आहेत. मध्यंतरी येथील सत्ताधारी आघाडीचे प्रमुख राजेंद्र भाटळे यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन जागा देण्याची तयारी दाखविली होती.अन्यत्र जागा उपलब्ध होत नाही हे स्पष्ट झाल्यावर पुन्हा हा विषय चर्चेत आल्याने ग्रामपंचायतीने हा ठराव केला आहे.राधानगरी : राधानगरी ग्रामपंचायतीने राज्य राखीव पोलीस दलाचा प्रशिक्षण तळ उभारण्यासाठी गायरानातील साठ एकर जागा देण्याची तयारी दाखविली आहे. याबाबतचा ठराव मंगळवारच्या गावसभेत मंजूर केला आहे. सरपंच सुनीता अनंत गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामुळे जागेअभावी जिल्ह्याबाहेर जाणारा हा प्रकल्प जिल्ह्यातच राहण्याची शक्यता वाढली आहे.