शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी रस्सीखेच

By admin | Updated: January 13, 2015 00:06 IST

ज्येष्ठ क्रीडा संघटक आमने-सामने : २६ जानेवारीला पुरस्कार प्रदान

आदित्यराज घोरपडे -सांगली -जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटक आमने-सामने उभे आहेत़ यंदाच्या वर्षी ‘क्रीडा संघटक’ पुरस्कारासाठी काट्याची टक्कर होणार आहे़ कारण जिल्ह्यातील ज्येष्ठ अनुभवी क्रीडा संघटकांनी पुरस्कारासाठी शड्डू ठोकले आहेत़ यामध्ये इस्लामपूरचे प्रा़ वीरसेन पाटील (कबड्डी), आष्ट्याचे भगवान बोते (हातोडाफेक) व जतचे हाजीसाहेब मुजावर (अ‍ॅथलेटिक) यांचा समावेश आहे़ दोन वर्षांपूर्वी प्रा. जहाँगीर तांबोळी (सांगली) व प्रा़ सिद्राम चव्हाण (जत) यांच्यातही या पुरस्कारासाठी मोठी लढत झाली होती. त्यामुळे हा पुरस्कार ईर्ष्येचा, चुरशीचा आणि मानाचाही बनला आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (प्रशिक्षक) पुरस्कारासाठीही तगडा मुकाबला होणार आहे. कुपवाडचे संतोष कर्नाळे (खो-खो) व राजकुमार पवळकर (शूटिंगबॉल) आणि मिरजेच्या पूजा पाटील (हँडबॉल) या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. गुणवंत खेळाडू पुरुष गटात एकूण चार प्रस्ताव दाखल झाले आहेत. यामध्ये कवठेपिरानचा राष्ट्रीय विजेता अमोल जाधव (खो-खो), सांगलीचा हुसेन कोरबू (सायकलिंग), आष्ट्याचा कपिल बोते (हातोडाफेक) व पलूसचा रघुनाथ माळी (जलतरण) यांचा समावेश आहे. महिला गटात मिरजेची काजल काळे (जिम्नॅस्टिक), जतची स्वाती व्हनवाडे (क्रॉसकंट्री), सांगलीवाडीची पुष्पांजली चव्हाण (तलवारबाजी) व आष्ट्याची कोमल भोसले (थांगता) या रणरागिनींमध्ये थेट लढत होणार आहे. बोते पिता-पुत्रांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इस्लामपूरचे वीरसेन पाटील हे पक्के कबड्डीपटू असून, ‘बॅक किक’वर त्यांचे प्रभुत्व आहे. आष्टा नगरीच्या राजकीय पटावर घडलेले भगवान बोते ‘थ्रोर्इंग’मध्ये एक्स्पर्ट आहेत. खेळाडूंमध्ये काजल काळे, हुसेन कोरबू व अमोल जाधवचे पारडे जड वाटत आहे. मिरजेच्या दीपक सावंत यांचा पाठिंबा कोणाला मिळतो यावर मार्गदर्शक पुरस्कारातील दावेदारांचे भवितव्य अवलंबून आहे. पुरस्कारांच्या या वेगवान घडामोडींमध्ये कोणाच्या गळ्यात पुरस्काराची माळ पडणार हे प्रजासत्ताकदिनीच कळेल. रक्कम वाढली२०१२ पर्यंत रोख रक्कम रूपये दोन हजार शंभर, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते़ दरवर्षी एकूण तीन पुरस्कार दिले जायचे़ २०१३ पासून पुरस्काराची रक्कम वाढली असून, ती २१०० ऐवजी दहा हजार झाली आहे़ पुरस्कार तीनऐवजी चार झाले आहेत़ वाढीव पुरस्कार महिला खेळाडू गटासाठी आहे़ जिल्हा क्रीडा पुरस्कारविविध क्रीडा प्रकारांचा जिल्ह्यात प्रचार-प्रसार होऊन त्यांचा विकास व्हावा, खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांचा उचित सन्मान होऊन त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे २००३ पासून प्रतिवर्षी ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक’, ‘उत्कृष्ट खेळाडू’ व ‘गुणवंत क्रीडा संघटक’ या पुरस्कारांचे वितरण केले जाते. प्रत्येक वर्षी २६ जानेवारीला त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाते.