शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ रस्त्याप्रश्नी आठवड्यात बैठक घेऊ: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:58 IST

उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट असलेल्या नेर्ली,तामगाव, उजळाईवाडी या मार्गाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मागणीवह विविध प्रश्नांसंदर्भात आठड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी उजळाईवाडी-कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

ठळक मुद्देविमानतळ रस्त्याप्रश्नी आठवड्यात बैठक घेऊ: जिल्हाधिकारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट असलेल्या नेर्ली,तामगाव, उजळाईवाडी या मार्गाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मागणीवह विविध प्रश्नांसंदर्भात आठड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी उजळाईवाडी-कोल्हापूरविमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन दिले. यावेळी आ. सतेज पाटील व कृती समितीचे अध्यक्ष नारायण पोवार म्हणाले, नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी हा रस्ता विस्तारीकरणासाठी समाविष्ट झाला आहे. याला पर्यायी मार्ग हा गोकुळ शिरगावच्या हद्दीतील जमिनीच्या काही गटांमधून देण्यात आला आहे. हा रस्ता अव्यवहार्य आहे. कारण पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक ४ वर गोकुळ शिरगाव हद्दीत कोंडुस्कर पेट्रोल पंप व सुदर्शन पेट्रोल पंप यांच्यामध्ये निघतो.

हा मार्ग ज्या ठिकाणी महामार्गाशी संलग्न होतो. तेथून कोल्हापूरकडे जाण्याकरीता मयूर पेट्रोल पंपाच्या भुयारी मार्गापर्यंत विरुध्द व चुकीच्या दिशेने ७०० मीटरपर्यंत गोकुळ शिरगावकडे जाताना ओढ्याच्या सेवा रस्त्यावरील पुलावरुन जाणारा आहे.

हा पुल जुना ब्रिटीशकालिन असून त्याची वैधताही संपली आहे. तसेच त्याचा आकार हा वक्राकार असल्याने व उंचीची वाहने येथून जाऊ शकत नसल्याने ते त्रासदायक होणार आहे. त्यामुळे नेर्ली, तामगाव रस्ता व गोकुळ शिरगाव हद्दीत मयूर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्ग जोडून मिळावा.यावर जिल्हाधिकारऱ्यांनी आठवड्यात बैठक घेऊन या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. तसेच या प्रशनावर संबंधित अभियंत्याशीही चर्चा करु असेही त्यांनी सांगितले.त्याचबरोबर विमानळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने नोकरी द्यावी, शेतकऱ्यांना विमानतळ प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा अशा विविध मागण्यांबाबत चर्चा झाली.यावेळी समितीचे निमंत्रक राजू माने, प्रकाश् पाटील, तम्मा शिरोळे, सर्जेराव मिठारी, भैरु केसरकर, शशिकांत खोत, मोहन खोत, संजय चौगले, हंबीरराव पाटील, अजित पाटील, शितल खोत, मधुकर कांबळे, यांच्यासह नेर्ली,तामगाव, हालसवडे, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर