शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरच परीक्षा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : आमचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. त्यामुळे आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : आमचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. त्यामुळे आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच परीक्षा घ्यावी, अशी मागणी पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांतून होत आहे. फार्मसीच्या (औषधनिर्माण शास्त्र) दि्वतीय (सेमिस्टर थर्ड), तृतीय (सेमिस्टर फाईव्ह), अंतिम वर्षाच्या (सेमिस्टर सेव्हन) विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याची तयारी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पॉलिटेक्निकमधील प्रथम वर्षाचे वर्ग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन सुरू झाले. त्यांचे ऑफलाईन वर्ग गेल्या आठवड्यापासून भरविण्यात येत आहेत. प्रथम वर्षाचा आतापर्यंत ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. फार्मसीच्या प्रथम वर्षाची प्रवेश परीक्षा दि. ६ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली असून वर्गही सध्या भरत आहेत. त्यांचे पहिले सत्र लवकर आटोपून परीक्षा घेण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे. बी. फार्मसी अभ्यासक्रम हा चार वर्षांचा आहे. त्यात एका वर्षामध्ये दोन सत्र (सेमिस्टर) होतात. दि्वतीय , तृतीय आणि अंतिम वर्षाचे वर्ग जूनपासून ऑनलाईन पध्दतीने सुरू आहेत. या वर्षांचा सरासरी ८० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्या वर्षांतील ऑड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. १५ मार्चपासून होणार आहेत. त्यामुळे परीक्षा देण्याची तयारी फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून सुरू आहे, तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर आमची परीक्षा घ्या, अशी मागणी पॉलिटेक्निकचे विद्यार्थी करत आहेत.

प्राचार्य काय म्हणतात...

मार्चमध्ये ऑड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. या विद्यार्थ्यांचा ८० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.

- डॉ. एच. एन. मोरे,

प्राचार्य, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी.

ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. आतापर्यंत ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र दि. ६ मार्चला संपणार आहे. त्यामुळे अजून वेळ असून अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल.

- प्रशांत पट्टलवार, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन.

काय म्हणतात विद्यार्थी...

भविष्याचा विचार करता, आमचा अभ्यासक्रम कमी करू नये. त्याऐवजी अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घ्यावी. याबाबत पॉलिटेक्निकने विचार करून लवकर निर्णय घ्यावा.

- विनायक कुंभार, पॉलिटेक्निक विद्यार्थी, तिरपण (ता. पन्हाळा)

आतापर्यंत आमचा ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. दि. ६ मार्चला आमचे पहिले सत्र पूर्ण होणार आहे. तोपर्यंत उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण होईल असे वाटते. प्रात्यक्षिके ही ऑफलाईन पध्दतीने घेण्यात यावीत.

- अपूर्वा बुरूड, पॉलिटेक्निक विद्यार्थिनी, नानीबाई चिखली (ता. कागल)

ऑनलाईन पध्दतीने आमचा अंतिम वर्षाचा बहुतांश अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. सध्या प्रॅक्टिकलही सुरू झाली आहेत. अन्य विद्यापीठांच्या तुलनेत आमच्या परीक्षांना विलंब झाला आहे. परीक्षा देण्याची आमची तयारी आहे.

- ओंकार पाटील, बी. फार्मसी. विद्यार्थी, कंदलगाव (ता. करवीर)

आमचा अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम कव्हर झाला आहे. ऑनलाईन शिक्षण घेताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. काही मुद्दे पुन्हा समजावून घेतले. सेल्फ स्टडीवर भर दिला.

- किमया जोशी, बी. फार्मसी विद्यार्थिनी, कळंबा (ता. करवीर)

चौकट

...अन्यथा कौशल्यावर परिणाम

फार्मसी आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रम हे व्यावसायिक स्वरूपाचे आहेत. त्यांचा अभ्यासक्रम शंभर टक्के पूर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम कमी केल्यास त्याचा त्यांच्या कौशल्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात...

पॉलिटेक्निक कॉलेज : २२

प्रवेश क्षमता : ६५००

प्रवेशित विद्यार्थी : ४०००

फार्मसी कॉलेज : १५

प्रवेश क्षमता : १३००

प्रवेशित विद्यार्थी : १२८०