शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळ्यांतून दरोडा घालणाऱ्यांचा बंदोबस्त करा  : कृती समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 11:44 IST

muncipalty, kolhapurnews घरफाळा विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शहर, जिल्हा कृती समितीने केली होती. चार महिने झाले तरी महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले. यामुळे कृती समितीच्यावतीने शुक्रवारी महापालिकेसमोर अभिनव पद्धतीने निदर्शने केली. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, लेझीम, हलगीच्या कडकडाटाने प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. घरफाळ्यातून भ्रष्टाचार करून महापालिकेवर दरोडा घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली.

ठळक मुद्देश्वेतपत्रिकेसाठी महापालिकेसमोर अभिनव पद्धतीने निदर्शने मर्दानी खेळांची प्रत्यक्षिक, लेझीम, हलगीच्या कडकडाटाने प्रशासनाचा निषेध

कोल्हापूर : घरफाळा विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शहर, जिल्हा कृती समितीने केली होती. चार महिने झाले तरी महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले. यामुळे कृती समितीच्यावतीने शुक्रवारी महापालिकेसमोर अभिनव पद्धतीने निदर्शने केली. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, लेझीम, हलगीच्या कडकडाटाने प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. घरफाळ्यातून भ्रष्टाचार करून महापालिकेवर दरोडा घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली.कृती समितीचे रमेश मोरे म्हणाले, २३ जून २०२० ते आजअखेर निवृत्त न्यायाधीशांमार्फत घरफाळा विभागाची चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली होती. यावर सात दिवसांची अंतिम मुदत देऊनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पहिला टप्पा म्हणून प्रशासनाला जाग आणण्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने केली. पुढील टप्प्यात आंदोलन आक्रमक करणार असून प्रशासन जबाबदार राहील.घरफळा चौकशीप्रमुख उपायुक्त निखील मोरे म्हणाले, कोरोनामुळे कृती समितीच्या मागणीची पूर्तता करता आली नाही. संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून नोटीस बजावली आहे. समितीसोबत लवकरच बैठक घेऊन सर्व माहिती देऊ. यावेळी कृती समिती अशोक पोवार, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, सुनीता पाटील, सुवर्णा मिठारे, विद्या पवार, पूजा पाटील, अनिता जाधव, सुजाता खराडे, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते.लक्षवेधी फलकमहापालिकेवर दरोडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, महापालिकेला लागलेल्या घुशीवर औषध फवारणी करा, महापालिका लुटणाऱ्या नराधमांचा धिक्कार असो, लक्षवेधी फलकासह प्रशासनाला जाग आणण्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने केली. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर