शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी, अवमान होऊ नये, याची घ्या दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:31 IST

स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचे आवाहन

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम तसेच महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी तसेच नागरिकांकडून कागद व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.

हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यांवर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम १.२ ते १.५ मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे.प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदीचे पालन करावे. कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन केले आहे. 

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी