म्हाकवे : राजे फाउंडेशनच्या सहकार्याने पायावर शस्त्रक्रिया झालेल्या नानीबाई चिखली (ता.कागल) येथील आशिष पाटील या चिमुकल्याची भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी त्याच्या घरी जाऊन प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
आशिष पाटील याचा मोटारसायकस्वाराने ठोकरल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली होती. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे ऑपरेशनचा खर्च कसा करायचा अशा विवंचनेत त्याचे कुटुंबीय होते. याबाबत त्यांनी घाटगे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यानंतर त्यांनी राजे फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया केली. याबद्दल पाटील कुटुंबीयांनी राजे फाउंडेशनच्या तत्परतेबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
चौकट
राजे फाउंडेशनच्या वैद्यकीय सहायता कक्षाची मदत घ्या
नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीच्या दृष्टीने कागल व गडहिंग्लज येथे राजे फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन केला आहे. कोणत्याही आजाराबाबत शासकीय योजनांच्या माध्यमातून औषधोपचार व मदत मिळविण्यासाठी या वैद्यकीय सहायता कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही घाटगे यांनी केले.
कँप्शन
चिखली येथे पायावर शस्त्रक्रिया झालेल्या आशिष पाटील या चिमुकल्याची आस्थेवाईकपणे चौकशी करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे.