शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बाळूमामा देवालयातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा; सेवेकरी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 27, 2024 17:47 IST

अधिकाऱ्यांकडून चौकशीत दिरंगाई, भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठिशी कोण?

कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरु बाळूमामा देवालयात भ्रष्टाचार प्रकरणात धर्मादायमधील चौकशी अधिकाऱ्यांक़डून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. भ्रष्टाचारी विश्वस्तांवर कायदेशीर कारवाई करावी, या प्रकरणी सीआयडीकडून चौकशी व्हावी या मागणीसाठी बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदु जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

समन्वयक सुनील घनवट, निखील मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी सुनील घनवट म्हणाले, बाळूमामांसाठी भक्तांनी वाहिलेला पैसा भक्तांच्याच सुविधांसाठी वापरला गेला पाहीजे. पण अनेक वर्षे विश्वस्तांनी भ्रष्टाचार करून भक्तांची फसवणूक केली आहे. त्यांची सीआयडी चौकशी झाली पाहीजे. त्यांना पाठिशी कोण घालत असेल तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहीजे.बाबासाहेब भोपळे म्हणाले, भ्रष्टाचाराविरोधात काहीजण न्यायालयीन लढा देत आहेत, त्यांना आमचा पाठिंबा आहे. निखील मोहिते म्हणाले, बकरी विक्री थांबवल्याने बग्यातील बकऱ्यांचे हाल सुरू आहेत. कारभारी त्रस्त आहेत. देवालयाच्या कारभारावर कोणाचाही अंकुश नाही. गजानन तोडकर, संभाजी भोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मानतेश नाईक, दयानंद कोणकेरी, परेश शहा,संदिप सासने, पराग फडणीस, दिपक देसाई, अक्षय ओतारी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठिशी कोण?अधिकारी भ्रष्टाचाऱ्यांची चौकशी का करत नाही. शिवराज नाईकवाडे सारख्या चांगल्या प्रशासकाला बाजूला करून भ्रष्टाचारी व्यक्तीची तिथे नियुक्ती केली आहे. हे अधिकारी आपल्यासोबत खासगी बाऊन्सर घेऊन फिरतात. मंदिर आवारात बाऊन्सरची गरज काय, अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालण्यासाठीच आणून बसवले आहे का? असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलंCorruptionभ्रष्टाचार