कोपार्डे : ‘अच्छे दिन’ची वल्गना करणाऱ्या भाजप सरकारमधील ‘ताई-माई’च्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांना ऊत आला आहे. गेल्या सात महिन्यांत राज्यातील १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे कॉँग्रेसच शेतकऱ्यांचे तारणहार असून, कॉँग्रेस सत्तेत असताना कर्जमुक्त करण्यासाठी केंद्राने ७२ हजार, तर राज्यातील अशोक चव्हाण यांच्या सरकारने सहा हजार २०० कोटी दिले. मात्र, आता भूमिअधिग्रहण कायदा आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव असल्याचा घणाघाती आरोप कॉँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केला.यवलूज (ता. पन्हाळा) येथे नागरिका स्पिनिंग मिल येथील कर्मचारी व प्रशासनामधील वाद मिटविण्यासाठी ते मुंबईहून आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारवर ताशेरे ओढले.जगताप म्हणाले, सध्या साखर कारखाने अडचणीत असल्याने चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे थकीत आहेत. शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे घेण्यासाठी पैसा नाही, अशावेळी शेती कर्जाचे पुणर्गठण करायला निघाले आहे. हा प्रकार पुन्हा शेतकऱ्यांचीमान कर्जाच्या कचाट्यात घालण्याचा हा प्रकार आहे. भाजप सरकारच्या काळात केवळ सात महिन्यांत १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्या भाजपने शेतकऱ्यांच्या कॉँग्रेसच्या कार्यकाळातील आत्महत्येचे भांडवल केले ते आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित केला.भूमिअधिग्रहणाचा १८९४ चा कायदा अंमलात आणण्यासाठी ११२ वर्षे लागली. मात्र, सुषमा स्वराज व अरुण जेटली या सरकारच्या वकील जोडगळीने तो एका वर्षात अंमलात आणण्यास घाई करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप केला.
‘ताई-माई’मुळे भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराला ऊत
By admin | Updated: July 3, 2015 00:43 IST