शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ताई-दादा...सांगा, माझी काँगे्रस कुठं हाय ओ!

By admin | Updated: November 15, 2016 00:28 IST

गडहिंग्लज पालिका : एस. एस. घाळींच्या पश्चात काँगे्रस पालिकेतील सत्तेपासून दूरच

राम मगदूम --गडहिंग्लज --सलग २२ वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेले डॉ. एस. एस. घाळी यांच्या पश्चात सर्वसमावेशक नेतृत्व न मिळाल्यामुळेच अपवाद वगळता काँगे्रस पक्ष गडहिंग्लज पालिकेच्या सत्तेपासून दूरच राहिला. गटबाजी आणि स्वार्थाची बाधा झालेल्या नेत्यांमुळेच गडहिंग्लजमधून काँगे्रस हद्दपार झाली. याची प्रचिती नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा आली. ६० च्या दशकात काँगे्रसला डॉ. घाळींचे नेतृत्व लाभले. त्यामुळेच गडहिंग्लजमध्ये विविध संस्थांची उभारणी व पक्षाची मजबूत बांधणी झाली. मात्र, त्यानंतर गटबाजीची बाधा कायम राहिली. त्यामुळेच हा पक्ष आता अस्तित्वहीन झाला. १९९१ मध्ये बाबासाहेब कुपेकर यांनी भाजप-सेनेसह सर्व पक्ष-गटांची मोट बांधून ‘राजर्षी शाहू आघाडी’च्या माध्यमातून जनता आघाडीकडून पालिकेची सत्ता काढून घेतली. मात्र, अंतर्गत मतभेद आणि लाथाळ्यामुळेच नशिबाने मिळालेली सत्ता काँगे्रसला अबाधित ठेवता आली नाही. त्याचीच पुनरावृृत्ती राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर २००१मध्ये सर्वपक्षीय महालक्ष्मी आघाडी आणि २०११ मध्ये राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत झाली. त्याचाच फटका कुपेकरांच्या पश्चात राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांना व पक्षाला बसला. १९९१, २००१ व २०११ या तीन निवडणुकांचा अपवाद वगळता दर दहा वर्षांनी पालिकेत सत्तांतर झाले. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या काँगे्रस व राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांना ती सत्ता अबाधित राखता आली नाही.१९७० च्या दशकापासून पालिकेच्या राजकारणात सक्रिय राहिलेल्या अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घाळी यांच्याप्रमाणेच समाजाभिमुख राजकारणाचा कित्ता गिरविला आणि बहुजन समाजातील डझनभर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदाचा बहुमान दिल्यानेच गडहिंग्लजवर त्यांची पकड निर्माण झाली.गतवेळी जनता आघाडीबरोबर आणि यावेळी राष्ट्रवादीबरोबर युती करून काँगे्रसचे चिन्ह पुन्हा जनमाणसात रुजविण्याचा प्रयत्न आमदार सतेज पाटील यांनी केला. मात्र, त्यांना स्थानिक नेते व परिस्थितीची साथ मिळाली नाही. यामुळेच नेते, ‘काँगे्रस’प्रेमी गडहिंग्लजकरांना कपाळावर ‘हात’ मारून घेण्याची वेळ आली आहे.