शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मोक्का’ न्यायालय कोल्हापुरात सुरु करण्यासाठी प्रयत्न : रणजित गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:44 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी नवीन पदाधिकारी लवकरच मुख्य न्यायाधिशांची भेट घेणार आहेत. या प्रश्नाबरोबरच लवकरचं पुणे येथील विशेष मोक्का न्यायालय, कर्ज वसुली प्राधिकरण आणि महाराष्ट्र महसुल न्यायाधिकरण ही तीन विशेष न्यायालये कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे यांनी दिली.

ठळक मुद्देकर्ज वसुली प्राधिकरण, महाराष्ट महसुल न्यायाधिकरण न्यायालये स्थापन करणार‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी नवीन पदाधिकारी लवकरच मुख्य न्यायाधिशांची भेट घेणार आहेत. या प्रश्नाबरोबरच लवकरचं पुणे येथील विशेष मोक्का न्यायालय, कर्ज वसुली प्राधिकरण आणि महाराष्ट्र महसुल न्यायाधिकरण ही तीन विशेष न्यायालये कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे यांनी दिली.

जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेनंतर त्यांनी पदाधिकारी, सदस्यांसह ‘लोकमत’ कार्यालयास शनिवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी केले.अ‍ॅड. गावडे म्हणाले, सर्किट बेंचसाठी वकीलांचा लढा सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना पत्रव्यवहार करुन भेटीची वेळ घेत आहोत. जिल्ह्यात ३० पेक्षा जास्त गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई झाली आहे. आरोपींना घेऊन पोलीसांना तीनशे कि. मी. अंतर पार करुन पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात सुनावणीसाठी जावे लागते.

यामध्ये आरोपींच्या सुरक्षेचा ताण पोलीसांवर पडतो. शिवाय वेळ, खर्चही होतो. मोक्का कारवाईची आकडेवारी पाहिली असता कोल्हापुरात विशेष मोक्का न्यायालय सुरु करण्याची गरज आहे. कोल्हापुरात जिल्हा व सत्र न्यायालय असल्याने याठिकाणी विशेष मोक्का न्यायालयात सुरु करता येते.

पुणे मोक्का न्यायालयाकडून कोल्हापूर जिल्हा न्यायालयास अधिकार प्रधान करण्याची प्रक्रिया आहे. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. तसेच कर्ज वसुली प्राधिकरण व महाराष्ट्र महसुल न्यायाधिकरण ही दोन्ही न्यायालये पुणे येथे आहेत. त्यासाठीही वकील, पक्षकारांना पुणे येथे जावे लागते.

जिल्ह्यात खटल्यांचे काम वाढल्याने या दोन्ही न्यायालयांचेही काम वाढले आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकीलांच्या सोयीसाठी ही तिन्ही न्यायालये लवकरच कोल्हापुरात सुरु करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे.

यावेळी त्यांचे सोबत उपाध्यक्ष जयेंन्द्र पाटील, सचिव गुरुप्रसाद माळकर, सह सचिव पृथ्वीराज आंबेकर, लोकल आॅडीटर अतुल जाधव, महिला प्रतिनिधी रेश्मा भूर्के, सदस्य वैभव काळे, योगेश नाझरे, सर्वेश राणे, अमित पाटील, सपना हराळे, शिल्पा सुतार, कादंबरी मोरे, अजित पाटील, रमेश पोवार आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :advocateवकिलkolhapurकोल्हापूर