शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती दिनी लावला विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रतीकात्मक फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 16:47 IST

शिवजयंती दिनी मंगळवारी इचलकरंजी नवीन युवक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर’ असा प्रतीकात्मक  फलक विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात लावला.

ठळक मुद्देशिवजयंती दिनी लावला विद्यापीठाच्या नामविस्ताराचा फलकनवीन युवक सेनेचा उपक्रम; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

कोल्हापूर : शिवजयंती दिनी मंगळवारी इचलकरंजी नवीन युवक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर’ असा प्रतीकात्मक  फलक विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात लावला.या सेनेचे कार्यकर्ते दुपारी बाराच्या सुमारास विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांनी याठिकाणी असलेला जुन्या फलकावर ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर’ असा उल्लेख असणारा दुसरा फलक लावला. या कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.

यावेळी सेनेचे अध्यक्ष संतोष कांदेकर, योगेश चव्हाण, सुभाष वद्दी, राहुल लोणारे, गणेश नागे, आकाश यादव, विशाल आस्माणे, मनोज कोरवी, आदी उपस्थित होते. या विद्यापीठाच्या नावामध्ये सध्या छत्रपतींचा एकेरी उल्लेख होतो. ते योग्य नाही. सन्मानकारक उल्लेख व्हावा, यासाठी विद्यापीठाचा नामविस्तार ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर’ असा करावा, या मागणीसाठी आम्ही विद्यापीठ प्रशासनाला निवेदने दिली आहेत, आंदोलन केले आहे. मात्र, विद्यापीठाकडून त्यादृष्टीने काहीच कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे शिवजयंती दिनी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा फलक आम्ही लावला असल्याचे नवीन युवक सेनेचे अध्यक्ष संतोष कांदेकर यांनी सांगितले. विद्यापीठाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नामविस्तार लवकरात लवकर करावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कांदेकर यांनी यावेळी दिला. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर