शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची तलवार म्यान

By admin | Updated: April 27, 2016 01:02 IST

एफआरपीचा प्रश्न : नुसत्या आश्वासनासाठीच आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराबाबत घेतलेल्या भूमिकेने शेतकऱ्यांमध्येच संभ्रमावस्था आहे. साखर कारखान्यांनी बैठक घेऊन १ मेपासून उर्वरित एफआरपी देण्याचे मान्य केले असतानाही १५ एप्रिलचा आग्रह धरत पालकमंत्र्यांना महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करू न देण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर ३० एप्रिलची डेडलाईन देत १ मेपासून मंत्र्यांच्या गाड्या राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीने दिला. मात्र, सहकारमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची ‘तलवारच म्यान’ केल्याने इशाऱ्यामागून इशारे देऊन स्वाभिमानीने नेमके काय साधले, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यंदाच्या हंगामात ‘स्वाभिमानी’ने घेतलेल्या भूमिकाांमुळे त्यांच्यावर सुरुवातीपासूनच टीका होत राहिली. जिल्ह्यातील कारखानदारांनी बैठक घेऊन १ मेपासून उर्वरित एफआरपी शेतकऱ्यांना आदा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत कारखान्यांनी पैसे दिले नाही तर कारखानदार व सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण करू न देण्याचा इशाराही दिला होता. पुन्हा ‘स्वाभिमानी’ आक्रमक झाली आणि ३० एप्रिलपर्यंत पैसे दिले नाही तर १ मेपासून राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा दिला. मंत्री पाटील यांनी मुंबईतील बैठकीत ३० एप्रिलपर्यंत एफआरपी नाही दिली तर साखर जप्तीचा इशारा आणि ‘स्वाभिमानी’ने आंदोलनाची ‘तलवार म्यान’ केली. कारखानदारांनी १ मे पासून एफआरपी देण्याचे मान्य केले होते, मग सततच्या इशाऱ्यांतून ‘स्वाभिमानी’ने काय साधले. मग ही आदळाआपट नेमकी कशासाठी होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्तेचे राजकारण अवघड जागेवरील दुखणंदोन्ही कॉँग्रेसवर हल्ला चढवत ‘स्वाभिमानी’ने प्रत्येक वर्षी रस्त्यावरची लढाई केली. त्यामध्ये किती यश-अपयश आले हे महत्त्वाचे नसले तरी तत्कालीन सरकारविरोधात जनमत तयार करण्यात ते यशस्वी ठरले होते; पण आता तेच सत्तेत असल्याने त्यांना कोणत्याही एका भूमिकेवर ठाम राहता येईना. सत्तेचे राजकारण त्यांच्यासाठी अवघड जागेचे दुखणे झाल्याची चर्चा आहे.