शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मीनाकुमारी युगाचा सुगंध दरवळला

By admin | Updated: April 2, 2016 00:26 IST

‘एक थी पाकिजा...’ : ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’तर्फे आयोजन; अलोट गर्दी

कोल्हापूर : ‘चलते चलते, यूॅँही कोई मिल गया था...’, ‘अजीब दास्तॉँ है ये, कहॉँ शुरू कहॉँ खतम...’ ‘चलो दिलदार चलो, चॉँद के पार चलो..’ यासारख्या विविध सदाबहार गीत-संगीताच्या सादरीकरणाद्वारे मीनाकुमारी युगाचा सुगंध गुरुवारी (दि. ३१) पुन्हा दरवळला. निमित्त होते, कसदार अभिनयाने अजरामर झालेल्या आणि शायरीमुळे रसिकांच्या मनात स्थान मिळविलेल्या मीनाकुमारी यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘एक थी पाकिजा...’ कार्यक्रमाचे!केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’ या हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उपमहापौैर शमा मुल्ला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, दिलीप लडगे, वैशाली क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत मिठारी, पंडित कंदले, किसन कल्याणकर, आदी उपस्थित होते. ट्रॅजेडी क्वीन, अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी यांची शोकात्मक चरित्रगाथा आणि रूपेरी प्रवास दृक्-श्राव्य, निवेदन व थेट गाण्यांच्या कार्यक्रमातून चाहत्यांनी अनुभवला. यामध्ये सात गाणी थेट सादरीकरणाद्वारे, तर बारा गाणी मूळ स्वरूपात पडद्यावर दाखविण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चित्रपट प्रवासावर आधारित, बचपन की मुहब्बत को दिलसे है जुदा करना, रुक जा बीते ना मिलन की बेला, दिल जो न कह सका, इन्ही लोगों ने... इन्ही लोगों ने ले लिना दुपट्टा मेरा... या गीतांनी उपस्थितांना भूतकाळाची सफर घडविली. कृष्णधवलातील मूळ स्वरूपात दाखविण्यात आलेल्या ज्योती कलश झलके, मौसम है आशिकाना, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, न जाओ सैय्या छुडाके बैय्या... या गाण्यांनी चाहत्यांची वाहवा मिळविली. मीनाकुमारी यांच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील ‘मोहे भूल गये सावरियॉँ...’, ‘छू लेने दो नाजूक होंटो को... ’, ‘आज हम दुवाओं का असर देखेंगे...’ यासारख्या गीतांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. मीनाकुमारी यांच्या काही गीतांचे कीर्ती सुतार यांनी आपल्या सुरेल आवाजात सादरीकरण केले. त्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रथितयश गायक प्रल्हाद पाटील यांनी भावोत्कट निवेदनातून मीनाकुमारीचे जीवनचित्र उभे केले. विक्रांत पाटील यांनी त्यांना पार्श्वसंगीत साथ दिली. मंदार पाटील यांनी संकलन केले. स्क्रीन सादरीकरण सज्जन लोहार यांनी केले. चित्रफीत संकलन ‘मल्टिमिक्स सिस्टीम’चे मंदार पेटकर यांनी पाहिले. कार्यक्रमाची संकल्पना-संहिता पद्माकर कापसे यांनी, तर निर्मिती पद्मिनी कापसे यांची होती. मनोजकुमार यांचे अभिनंदन ‘भारतकुमार’ अशी उपाधी असणारे कलाकार मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून ‘हृदयस्पर्श’तर्फे लवकरच त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मीनाकुमारी युगाचा सुगंध दरवळला‘एक थी पाकिजा...’ : ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’तर्फे आयोजन; अलोट गर्दीकोल्हापूर : ‘चलते चलते, यूॅँही कोई मिल गया था...’, ‘अजीब दास्तॉँ है ये, कहॉँ शुरू कहॉँ खतम...’ ‘चलो दिलदार चलो, चॉँद के पार चलो..’ यासारख्या विविध सदाबहार गीत-संगीताच्या सादरीकरणाद्वारे मीनाकुमारी युगाचा सुगंध गुरुवारी (दि. ३१) पुन्हा दरवळला. निमित्त होते, कसदार अभिनयाने अजरामर झालेल्या आणि शायरीमुळे रसिकांच्या मनात स्थान मिळविलेल्या मीनाकुमारी यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘एक थी पाकिजा...’ कार्यक्रमाचे!केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’ या हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उपमहापौैर शमा मुल्ला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, दिलीप लडगे, वैशाली क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत मिठारी, पंडित कंदले, किसन कल्याणकर, आदी उपस्थित होते. ट्रॅजेडी क्वीन, अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी यांची शोकात्मक चरित्रगाथा आणि रूपेरी प्रवास दृक्-श्राव्य, निवेदन व थेट गाण्यांच्या कार्यक्रमातून चाहत्यांनी अनुभवला. यामध्ये सात गाणी थेट सादरीकरणाद्वारे, तर बारा गाणी मूळ स्वरूपात पडद्यावर दाखविण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चित्रपट प्रवासावर आधारित, बचपन की मुहब्बत को दिलसे है जुदा करना, रुक जा बीते ना मिलन की बेला, दिल जो न कह सका, इन्ही लोगों ने... इन्ही लोगों ने ले लिना दुपट्टा मेरा... या गीतांनी उपस्थितांना भूतकाळाची सफर घडविली. कृष्णधवलातील मूळ स्वरूपात दाखविण्यात आलेल्या ज्योती कलश झलके, मौसम है आशिकाना, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, न जाओ सैय्या छुडाके बैय्या... या गाण्यांनी चाहत्यांची वाहवा मिळविली. मीनाकुमारी यांच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील ‘मोहे भूल गये सावरियॉँ...’, ‘छू लेने दो नाजूक होंटो को... ’, ‘आज हम दुवाओं का असर देखेंगे...’ यासारख्या गीतांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. मीनाकुमारी यांच्या काही गीतांचे कीर्ती सुतार यांनी आपल्या सुरेल आवाजात सादरीकरण केले. त्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रथितयश गायक प्रल्हाद पाटील यांनी भावोत्कट निवेदनातून मीनाकुमारीचे जीवनचित्र उभे केले. विक्रांत पाटील यांनी त्यांना पार्श्वसंगीत साथ दिली. मंदार पाटील यांनी संकलन केले. स्क्रीन सादरीकरण सज्जन लोहार यांनी केले. चित्रफीत संकलन ‘मल्टिमिक्स सिस्टीम’चे मंदार पेटकर यांनी पाहिले. कार्यक्रमाची संकल्पना-संहिता पद्माकर कापसे यांनी, तर निर्मिती पद्मिनी कापसे यांची होती. मनोजकुमार यांचे अभिनंदन ‘भारतकुमार’ अशी उपाधी असणारे कलाकार मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून ‘हृदयस्पर्श’तर्फे लवकरच त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मीनाकुमारी युगाचा सुगंध दरवळला‘एक थी पाकिजा...’ : ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’तर्फे आयोजन; अलोट गर्दीकोल्हापूर : ‘चलते चलते, यूॅँही कोई मिल गया था...’, ‘अजीब दास्तॉँ है ये, कहॉँ शुरू कहॉँ खतम...’ ‘चलो दिलदार चलो, चॉँद के पार चलो..’ यासारख्या विविध सदाबहार गीत-संगीताच्या सादरीकरणाद्वारे मीनाकुमारी युगाचा सुगंध गुरुवारी (दि. ३१) पुन्हा दरवळला. निमित्त होते, कसदार अभिनयाने अजरामर झालेल्या आणि शायरीमुळे रसिकांच्या मनात स्थान मिळविलेल्या मीनाकुमारी यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘एक थी पाकिजा...’ कार्यक्रमाचे!केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकमत सखी मंच’ व ‘हृदयस्पर्श’ या हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उपमहापौैर शमा मुल्ला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, ‘हृदयस्पर्श’चे पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, दिलीप लडगे, वैशाली क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत मिठारी, पंडित कंदले, किसन कल्याणकर, आदी उपस्थित होते. ट्रॅजेडी क्वीन, अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी यांची शोकात्मक चरित्रगाथा आणि रूपेरी प्रवास दृक्-श्राव्य, निवेदन व थेट गाण्यांच्या कार्यक्रमातून चाहत्यांनी अनुभवला. यामध्ये सात गाणी थेट सादरीकरणाद्वारे, तर बारा गाणी मूळ स्वरूपात पडद्यावर दाखविण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चित्रपट प्रवासावर आधारित, बचपन की मुहब्बत को दिलसे है जुदा करना, रुक जा बीते ना मिलन की बेला, दिल जो न कह सका, इन्ही लोगों ने... इन्ही लोगों ने ले लिना दुपट्टा मेरा... या गीतांनी उपस्थितांना भूतकाळाची सफर घडविली. कृष्णधवलातील मूळ स्वरूपात दाखविण्यात आलेल्या ज्योती कलश झलके, मौसम है आशिकाना, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, न जाओ सैय्या छुडाके बैय्या... या गाण्यांनी चाहत्यांची वाहवा मिळविली. मीनाकुमारी यांच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील ‘मोहे भूल गये सावरियॉँ...’, ‘छू लेने दो नाजूक होंटो को... ’, ‘आज हम दुवाओं का असर देखेंगे...’ यासारख्या गीतांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. मीनाकुमारी यांच्या काही गीतांचे कीर्ती सुतार यांनी आपल्या सुरेल आवाजात सादरीकरण केले. त्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रथितयश गायक प्रल्हाद पाटील यांनी भावोत्कट निवेदनातून मीनाकुमारीचे जीवनचित्र उभे केले. विक्रांत पाटील यांनी त्यांना पार्श्वसंगीत साथ दिली. मंदार पाटील यांनी संकलन केले. स्क्रीन सादरीकरण सज्जन लोहार यांनी केले. चित्रफीत संकलन ‘मल्टिमिक्स सिस्टीम’चे मंदार पेटकर यांनी पाहिले. कार्यक्रमाची संकल्पना-संहिता पद्माकर कापसे यांनी, तर निर्मिती पद्मिनी कापसे यांची होती. मनोजकुमार यांचे अभिनंदन ‘भारतकुमार’ अशी उपाधी असणारे कलाकार मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून ‘हृदयस्पर्श’तर्फे लवकरच त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.