रत्नागिरी : आंबा घाटात अपघाती निधन झालेले सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दत्ता तथा डी. के. कुरतडकर यांच्या निधनामुळे रत्नागिरीत हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचे वृत्त कळताच त्यांच्या अनेक परिचितांनी आंबा घाटाकडे धाव घेतली.विद्युत मंडळामध्ये (महावितरण कंपनीमध्ये) ३२ वर्षे उत्कृष्ट सेवा केल्यानंतर जून २०११ मध्ये ते लातूर येथे अधीक्षक अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले. रत्नागिरीहून २००९ साली त्यांची लातूर येथे बदली झाली होती. रत्नागिरी येथे सेवेत असताना जिल्हानियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरीत पथदीप योजना राबविली. याची दखल घेत राज्यसरकारने २००७ -२००८ साली ही योजना संपूर्र्ण राज्यात अंमलात आणली. आंबडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव पर्यटन स्थळ म्हणून जाहीर होण्यासाठी त्यांनी जिल्'ातील सर्व धार्मिक संघटनांना एकत्र आणून पाठपुरावा केला होता. रत्नागिरीतील थिबाकालीन बुद्धविहार प्रशस्त बुद्धविहार होण्यासाठीही मागणी उचलून धरली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जिल्ह्ातील बौद्ध अधिकारी व कर्मचारी यांना एकत्र आणून सामाजिक स्तरावर कार्य करण्यासाठी ‘बुद्धिस्ट अधिकारी व कर्मचारी महासंघाची’ स्थापना केली. या महासंघाचे ते जिल्हाध्यक्ष होते. तसेच शाहू, फुले, आंबेडकर विचारमंचाचे कार्याध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर काही काळ त्यांनी आरपीआय आठवले गटाचे ते जिल्हा संघटक होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. समाजातील गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आदी उपक्रम राबवितानाच हुशार विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी पत्नी वृषाली यांच्यासमवेत त्यांनी मोफत मार्गदर्शनही देऊ केले. सध्या ते आपल्या मूळगावी कुरतडे (ता. रत्नागिरी) येथे बुद्धविहार बांधण्यासाठी प्रयत्नशील होते. पत्नी वृषाली येथील अ. के. देसाई हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गेल्याचवर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मोठा मुलगा कुणाल हा सध्या महावितरणमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असून दीड महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला. दुसरा मुलगा सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्न करीत आहे.
स्विफ्ट झाडावर आदळून दाम्पत्य ठार
By admin | Updated: June 9, 2016 01:21 IST