शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"स्वाभिमानी"चे मंगळवारी दूध बंद आंदोलन, ५ रुपये अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:26 IST

दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपयेचे तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ( २१) एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे''स्वाभिमानी''चे मंगळवारी दूध बंद आंदोलनदूधाला ५ रुपये अनुदानाची मागणी, केंद्राच्या पावडर आयात निर्णयाचा निषेध

कोल्हापूर ः दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपयेचे तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ( २१) एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.आज फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधला. घटलेल्या दुधाच्या दराबद्दल आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन ११९ लाख लिटर आहे. ५२ लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर ३३० रूपयांवरून १६० रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे.

देशात सध्या दीड लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील ५० हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर ३४० रूपयावरून २२० रूपये झाले आहे.याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संघ १७ ते २० रूपये लिटरने गायीच्या दुधाची खरेदी करत आहेत.

दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. मंगळवारी, शेतकर्‍यांनी गावातील ग्रामदैवताला प्रतिकात्मक अभिषेक घालून आपलं दूध घरातच ठेवावे. तसेच गोरगरीबांना दुधाचे वाटप करावे. असे आवाहन करत हे एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करून सरकारला हा निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे. यावर केंद्र व राज्य सरकारने आमचे ऐकलं तर ठीक अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाया आहेत मागण्या ः

  1. राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास ५ रूपयांचे अनुदान द्यावे.
  2. केंद्र सरकारने ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा.
  3. दूध पावडर करीता प्रतिकिलो ५० रूपये अनुदान देण्यात यावे.
  4. दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावे.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर