शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

By admin | Updated: May 22, 2017 01:10 IST

‘स्वाभिमानी’ची आजपासून ‘आत्मक्लेश’ पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असणाऱ्या ‘आत्मक्लेश’ यात्रेला आज, सोमवारपासून पुण्यातून सुरुवात होत आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी रविवारी पुण्याकडे रवाना झाले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या, शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करा, शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा, आदी मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या फुले वाड्यापासून ‘आत्मक्लेश’ यात्रेचे आयोजन केले आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला आज, सोमवारी सकाळी प्रारंभ होणार आहे. पुणे-खोपोली-पनवेल-वाशी ते मंत्रालय या मार्गावरून ही यात्रा जाणार असून, तब्बल नऊ दिवस राजू शेट्टींसह हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.रविवारी सायंकाळी कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यातील शेतकरी पुण्याकडे रवाना झाले. नवव्या दिवशी, ३० मे रोजी मंत्रालयावर धडक देऊन राज्यपालांना निवेदन दिले जाणार आहे. या यात्रेची तयारी गेले महिनाभर राज्यातील गावा-गावांत सुरू आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी ताकदीने घराबाहेर पडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून मोर्चेकऱ्यांसाठी रोज भाकऱ्या पाठविण्याचे नियोजनही केले आहे. कार्यकर्ते रात्रीच रवानास्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडीचे कार्यकर्ते रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वेने पुण्याला रवाना झाले. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. यात्रेत इचलकरंजीतील नाभिकांची सेवा शेतकऱ्यांच्या आत्मक्लेश यात्रेला पाठबळ देण्यासाठी समाजातील सर्वच घटक सरसावले आहेत. इचलकरंजीमध्ये रविवारी नागरिकांनी वर्गणी काढून खासदार राजू शेट्टी यांच्याकडे दिली तर यात्रेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी इचलकरंजीतील नाभिक समाजही पुढे आला आहे. काय आहेत मागण्या...शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा.उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या.शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करा.शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा.स्वामिनाथन कमिटीचा अहवाल स्वीकारा.