शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

‘स्वाभिमानी’चे ऊसतोड, वाहतूक बंद

By admin | Updated: December 17, 2015 01:40 IST

शिरोळ तालुक्यात मोटारसायकल रॅली : पट्टणकोडोलीत ऊसतोड बंद; रांगोळीत चार हजार टन ऊस नजरकैदेत, जवाहरचे गाळप दिवसभर ठप्प; बिद्रीत काटा बंद

जयसिंगपूर / कुरुंदवाड : यंदाच्या गळीत हंगामातील ‘एफआरपी’ची रक्कम ठरल्याप्रमाणे सर्व साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ऊसतोडी बंद केल्या तसेच काटा बंद ठेवण्यास भाग पाडले. मोटारसायकल रॅली शिरोळ तालुक्यात काढून ‘ऊसतोड व वाहतूक बंद’ करण्याचे आवाहन केले. रॅलीमध्ये शेकडो मोटारसायकलीवरून कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, काही गावातील ऊसतोडीकार्यकर्त्यांनी बंद पाडल्या.‘स्वाभिमानी’ने बुधवारी अकरा वाजता जयसिंगपूर येथील कार्यालयापासून मोटारसायकल रॅलीला प्रारंभ केला. ती जयसिंगपूर शहरातून शिरोळच्या दत्त टाकळीवाडी येथील गुरुदत्त कारखान्यावरून हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर, इचलकरंजीतील पंचगंगा व त्यानंतर नरंदे येथील शरद कारखान्याच्या परिसरात आली. तसेच कोरोची येथे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांच्या टायरमधील हवा काढून वाहतूक रोखली.रांगोळीत आठ हजार टन ऊस नजरकैदेतहुपरी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रांगोळी (ता. हातकणंगले) येथील कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्रीपासून सुरूकेलेले ऊसतोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. सुमारे ४00 हून अधिक वाहनांतील आठ हजार टन ऊस आंदोलनकर्त्यांच्या नजरकैदेत आहे.दरम्यान, या आंदोलनाबाबत शेतकरी संघटनेमध्येच दोन प्रवाह पुढे आले आहेत. पदाधिकाऱ्यांच्यामध्येच वाद-विवादाचे प्रसंग उभे राहिल्याचे चित्र आहे. गाळपासाठी आवश्यक त्या प्रमाणात उसाची उपलब्धता नसल्याने बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून येथील जवाहर साखर कारखान्याचे गाळप पूर्णपणे बंद केले. संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धास्ती घेऊन शेतकऱ्यांनी उसाची तोड घेण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील सर्वच कारखान्यांची उसतोड व उस वाहतूक दिवसभर बंद होती. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व कारखानदाराना मागण्या देण्यासाठी बुधवारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. जवाहर साखर कारखान्यासमोर रॅली येताच संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या बंद गेटवर मोटारसायकली चढविणे, लसणी गड्डे उडविणे असे प्रकार केले. दरम्यान, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये गैरसमज झाल्याने वाद झाला. तो सहाय्यक पोलीस निरिक्षक मधुकर काकडे, सहायक फौजदार संजय लोंढे, हवालदार बाळासाहेब पाटील, अरविंद सणगर, स्वाभिमानीचे सागर संभुशेटे, राजाराम देसार्इं, आदींनी मध्यस्थी करून मिटविला. त्यानंतर रॅली मार्गस्थ झाली. संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रफुल्ल मगदूम, एम. आर. पाटील, शीतल कंट्टी, जयवंत सादळे, राजगोंडा पाटील, सातगोंडा हुन्नुरगे, आण्णासो पाटील, सुनीलराज काटकर, आदी निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. ‘दत्त दालमिया’ची पहिली उचल कार्यकर्त्यांनी रोखलीपोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील दत्त दालमिया भारत शुगर या साखर कारखान्याने एफआरपीची पहिली उचल १७०० रुपयांनी बिल अदा करण्याची प्रक्रिया पन्हाळा तालुका स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाणून ााडली.‘स्वाभिमानी’च्या आक्रमक भूमिकेमुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रतिटन २०९१ रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन दिवसांत जमा केली जाईल, असे कंपनीकडून लेखी घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतरच रोखलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कोतोली-नांदगाव मार्गाच्या दुतर्फा उसाने भरलेले ट्रॅक्टर अडवून रस्त्याच्या बाजूला उभे केले आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर घोषणा देत ठिय्या आंदोलन केले.दरम्यान, पन्हाळा पोलिसांची कुमक बोलविण्यात आल्यामुळे कारखाना कार्यस्थळाला छावणीचे स्वरूप होते. पट्टणकोडोलीत कारखाना कार्यालयाला टाळेपट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे संतप्त कार्यकर्त्यांनी पंचगंगा साखर कारखान्याची ऊसतोड बंद करत कारखान्याच्या विभागीय कार्यालयास टाळे ठोकले. इतर कारखान्यांनी ऊसतोड थांबवली; मात्र केवळ पंचगंगा कारखान्यानेच बुधवारी पिराई, लोहार व दुर्गे यांच्या शेतामध्ये ऊसतोड केल्यामुळे कार्यकर्त्यांनी शेतामध्ये जाऊन ऊसतोड बंद पाडली. गावातील साखर कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी जयराम हुपरे, सुधीर आवटे, रमाकांत जोशी, प्रकाश नेहरे, प्रकाश खड्ड, शिवशांत माळी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.पंचगंगा साखर कारखान्यावर निदर्शनेइचलकरंजी : उसासाठी ८० टक्के एफआरपी मिळण्यासाठी येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य द्वारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. ते मोटारसायकल रॅलीने पंचगंगा साखर कारखान्याच्या कार्यस्थळी आले. यावेळी रेणुका शुगर्सच्या व्यवस्थापनाचा निषेध केला. जिल्हा परिषदेचे माजी सभापती सावकार मादनाईक, संघटनेचे इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष विजय भोसले, सागर शंभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ही निदर्शने करण्यात आली.‘एफआरपी’ न देणाऱ्या कारखान्यांवर प्रशासक नेमा : शेट्टीकोल्हापूर : कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी नागपूर येथे केली. कारखानदारांची अडचण समजावून घेऊन समझोता केला तरी कारखानदारांमध्ये मगरूरी असेल तर त्यांच्यावर कारवाई कराच, असा आग्रहही त्यांनी धरला. कायद्याने आम्हाला एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. त्यावर आम्ही आग्रही होतो; पण साखरेचे दर घसरल्याने कारखानदारी अडचणीत आहे. यासाठी ऊस खरेदी कर माफ केला, मळीवरील निर्बंध उठवून कारखानदारांना राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे काम केले. केंद्राने टनाला ४५ रुपये मदत केली, तरीही एकरकमी एफआरपी देता येत नसल्याची ओरड सुरू झाली. राज्य सरकारबरोबर झालेल्या समझोत्यानुसार एफआरपीमधील ८० टक्के पहिली उचल देण्याचा निर्णय झाला. परंतु, कारखानदारांनी त्यापेक्षा कमी दराने उचल देण्यास सुरुवात केली आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांची चेष्टा सुरू केली असून, त्यांनी आमचा संयम पाहू नये. माझी सरकारला विनंती आहे, आता आम्हाला कायद्याप्रमाणे एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करावे. तसेच त्या कारखान्यावर ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे बुधवारी केली. यावर, एवढे सहकार्य करूनही कोणी आडमुठे धोरण घेणार असेल तर कायद्याचा बडगा उगारावा लागेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.साखर कारखानदारांची आज बैठककोल्हापूर : साखर कारखान्यांनी देऊ केलेल्या प्रतिटन १७०० रुपये उचलीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केल्याने पेच निर्माण झाला आहे. यावर विचारविनिमय करण्यासाठी आज, गुरुवारी जिल्हा बॅँकेत साखर कारखानदारांची बैठक होत आहे. यात ‘स्वाभिमानी’च्या ८०-२० च्या फॉर्मुल्यावर चर्चा होणार आहे. यंदा एकरकमी एफआरपीवरच हंगाम सुरू झाला; पण साखरेचे दर व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन पावले माघार घेत ८०-२० टक्क्यांचा फॉर्मुला तयार केला. राज्य सरकारने मध्यस्थी करीत त्यावर शिक्कामोर्तब केले; पण काही साखर कारखान्यांनी १७०० रुपयांप्रमाणे रक्कम बॅँकेत जमा केली, तर काहींनी विकास संस्थांच्या याद्यांची छाननी केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेले दोन दिवस जिल्ह्णात वाहने आडवून कारखानदारांना इशारा दिला आहे. जिल्ह्णाच्या पश्चिम भागात शेतकरी संघटना अधिक आक्रमक झाली असून तिने ऊसवाहनांची तोडफोड सुरू केली आहे. गुरुवारनंतर आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशारा संघटनेने दिल्याने कारखानदार हबकले आहेत. ‘स्वाभिमानी’ची भूमिका, कारखानदारांची आर्थिक स्थिती याबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत दुपारी चार वाजता बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. यामध्ये जिल्ह्णातील सहकारी व खासगी कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत पहिल्या उचलीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.