शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

‘स्वाभिमान’चे प्रदेश संघटक अपघातात ठार

By admin | Updated: July 21, 2014 00:40 IST

राणेंना भेटले होते : कंटेनरने धडक दिल्याने अपघात

देवरूख : संगमेश्वरनजीक मुंबई-गोवा महामार्गावर उक्षी-मानसकोंड येथे झालेल्या फॉर्च्युनर गाडी आणि कंटेनर यांच्यातील अपघातात स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक सुभाष शंकर पाटील (वय ४२), आणि अश्विन नागेश पाटील (२७, दोघे रा. सोलापूर) ठार झाले. हा अपघात आज, रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. कणकवली (सिंधुदुर्ग) येथे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत असलेला स्नेहमेळावा आटोपून येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सुभाष पाटील व अश्विन पाटील हे दोघेजण फॉर्च्युनर गाडी (एमएच १३ बीएन ५५५५) घेऊन नारायण राणे यांना भेटण्यासाठी कणकवली येथे गेले होते. नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणारा स्नेहमेळावा आटोपून ते परतत होते. त्यांची गाडी उक्षी-मानसकोंडयेथे आली असता तिने पुढील वाहनाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. पुढील गाडी ओलांडण्यापूर्वीच समोरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरवर (एमएच ०८/एच २८४८) ही गाडी जाऊन आदळली. अपघात एवढा मोठा होता की, फॉर्च्युनर गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुभाष व अश्विन पाटील यांचे या अपघातात जागीच ठार झाले.अपघातग्रस्त गाडी सागर कर्णेकर (२८) हा चालवीत होता. दरम्यान, या दोघांच्या मृतदेहांचे विच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. याबाबतची फिर्याद नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.(प्रतिनिधी)---अपघातातील मृत सुभाष पाटील हे स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक तसेच ‘मनसे’चे सोलापूरचे माजी शहराध्यक्ष होते. ते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे राणे यांची भूमिका ऐकून घेण्यासाठी ते कणकवलीत गेले होते. पाटील यांनी वर्षभरापूर्वी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून १० हजार लोकांसाठी रोजगार मेळावाही आयोजित केला होता.