कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपास सुरू असताना कागल येथे दूधगंगा नदीच्या जुन्या पुलाजवळील पात्रामध्ये सोमवारी कागल पोलिसांना संशयास्पद हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल आढळली. दरम्यान, मारेकरी हे स्प्लेंडर मोटारसायकलवरून आल्याचे चित्रीकरण सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना यापूर्वी मिळाले आहे. या दोन्ही गाड्यांचे साम्य मिळते-जुळते आहे का, याचा पोलीस शोध घेत असले तरी मारेकऱ्यांचीच दुचाकी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पानसरे हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे एक विशेष पथक सोमवारी दुपारी औरंगाबादला रवाना झाले. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे धागेदोरे औरंगाबादमध्ये मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्ल्यादरम्यान मारेकरी हे स्प्लेंडर मोटारसायकलवरून आल्याचे चित्रीकरण सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना मिळाले आहे. हे चित्रीकरण अस्पष्ट असल्याने त्यांची ओळख पटवत असतानाच कागल येथे दूधगंगा नदीमध्ये मासेमारी करताना मच्छिमारांना जुन्या पुलाजवळील पात्रामध्ये गाळात दुचाकी गाडी आढळली. त्यांनी याबाबत कागल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डोझरच्या साहाय्याने दुचाकी बाहेर काढली असता ती हिरो होंडा स्प्लेंडर असल्याचे स्पष्ट झाले. या गाडीला दोन्ही बाजूला नंबरप्लेट नसल्याचे दिसून आले. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अंकिचौकट (प्रतिनिधी)नंबरप्लेटस् नसल्याने संशय बळावलादरम्यान, दूधगंगा नदीच्या जुन्या पुलाच्या बाजूला कर्नाटक हद्दीकडून ही गाडी पाण्यात ढकलली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. दुचाकीवर गाळाचा थर साचला असला तरी कोणताही भाग गंजलेला नसल्याने काही दिवसांपूर्वीच ही गाडी तेथे सोडली असल्याची शक्यता आहे. ही दुचाकी चोरीची आहे की कोणत्या गुन्ह्णातील आहे याचा शोध घेण्यासाठी चेस क्रमांकाच्या आधारे मालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मागील आणि पुढील दोन्ही नंबरप्लेट काढून टाकल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. गाडी सुस्थितीत आहे. काळ्या रंगात गुलाबी पट्टा असणारी ही स्प्लेंडर आहे. पानसरेंच्या मारेकऱ्यांनीही स्प्लेंडर मोटारसायकल वापरल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या दुचाकीचे या घटनेशी साम्य जुळते का, याची पोलीस माहिती घेत आहेत.
कागलमध्ये संशयास्पद स्प्लेंडर
By admin | Updated: February 24, 2015 00:56 IST