शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: September 13, 2015 00:43 IST

माहेरच्यांचा पोलीस ठाण्यात गोंधळ : पतीसह चौघे ताब्यात

कोल्हापूर : येथील संभाजीनगर परिसरात गजानन महाराज नगरमध्ये शनिवारी सायंकाळी नवविवाहिता स्वानंदी सुनील क्षीरसागर (वय २४) हिचा भाजून संशयास्पद मृत्यू झाला. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला. याबाबत माहिती अशी की, स्वानंदी सुनील क्षीरसागर हिचे माहेर रविवार पेठेतील पूलगल्ली तालमीशेजारी आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी स्वानंदी क्षीरसागर (माहेरचे नाव प्रज्ञा यादव) हिचा विवाह गजानन महाराज नगरातील सुनील क्षीरसागर याच्यासोबत झाला होता. सुनील क्षीरसागर हा रुकडीकर महाराज ट्रस्ट येथे लिपिक म्हणून नोकरीस आहे. शनिवारी दुपारी स्वानंदीच्या पतीसह घरातील सर्वजण घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यानंतर सायंकाळी ते सर्व घरी परतले. त्यानंतर सुनील क्षीरसागर याने स्वानंदीच्या माहेरी तिच्या भावाला घरी मोबाईलवर फोन करून सर्वांना इकडे येण्याबाबत सांगितले. त्यावेळी काहीतरी विपरीत घडल्याच्या शंकेने माहेरच्या लोकांनी स्वानंदीच्या गजानन महाराज नगरातील घरी धाव घेतली. त्यावेळी घरात तळमजल्यावर स्वानंदीचे पती सुनील क्षीरसागर तसेच सासू, सासरे, दीर व भावजय असे बसले होते. त्यानंतर स्वानंदीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत नातेवाइकांना पहिल्या मजल्यावरील स्नानगृहात पडल्याचा आढळून आला. घटनास्थळाचे हे दृश्य पाहून सारे हादरलेच. त्यानंतर स्वानंदीच्या माहेरकडील नातेवाइकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी नातेवाइकांनी सुनील क्षीरसागर याच्यासह सर्वांना शिवीगाळ करत तेथे गोंधळ घातला. तसेच नातेवाइकांनीच याची कल्पना जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ‘सीपीआर’मध्ये शवविच्छेदनासाठी नेला. दरम्यान, क्षीरसागर कुटुंबीयांनीच स्वानंदीला पेटवून ठार मारल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी करीत जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला. संशयितांवर कारवाईची मागणी केली. जमावाचा प्रक्षोभ पाहून पोलिसांनी स्वानंदीच्या पतीसह सासरे, सासू आदींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)