शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकांत मांडरे यांचा अनमोल ठेवा शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:28 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व चित्रकार सूर्यकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प त्यांनी साकारलेल्या भूमिकांची छायाचित्रे, मिळालेले पुरस्कार, पुस्तके असा त्यांचा ठेवा स्वरूपा मांढरे - पोरे यांनी गुरुवारी शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केला. अभिनयाबरोबरच चंद्रकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प, विविध चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका, व्यक्तिरेखा व प्रसंगांची छायाचित्रे, पुरस्कार, त्यांनी लिहिलेली पुस्तके हा सगळा ठेवाच यामध्ये आहे.

ठळक मुद्देसूर्यकांत मांडरे यांचा अनमोल ठेवा शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्दपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष सहकार्य

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व चित्रकार सूर्यकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प त्यांनी साकारलेल्या भूमिकांची छायाचित्रे, मिळालेले पुरस्कार, पुस्तके असा त्यांचा ठेवा स्वरूपा मांढरे - पोरे यांनी गुरुवारी शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केला. अभिनयाबरोबरच चंद्रकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प, विविध चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका, व्यक्तिरेखा व प्रसंगांची छायाचित्रे, पुरस्कार, त्यांनी लिहिलेली पुस्तके हा सगळा ठेवाच यामध्ये आहे.पुणे महापालिकेच्या अखत्यारितामधील आबा बाबुल उद्यानातील पं. भीमसेन जोशी संग्रहालयात या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या; मात्र हे साहित्य काही वर्षांपूर्वी पुणे महापालिकेने काढून ठेवले होते. ही बाब कळल्यानंतर मांडरे यांच्या पत्नी सुशीला मांडरे व नात स्वरूपा पोरे यांनी हे साहित्य परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते; त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

हा ठेवा शिवाजी विद्यापीठाला देण्यासाठी स्वरूपा पोरे यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी हा ठेवा संग्रहालयात ठेवण्याचे मान्य केले. त्यानुसार त्यांनी पुणे महापालिकेने मंगळवारी हे साहित्य सूर्यकांत मांडरे यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. हे साहित्य बुधवारी सायंक ाळी उशिरा ट्रकद्वारे शिवाजी विद्यापीठात दाखल झाले; गुरुवारी स्वरूपा मांढरे - पोरे यांनी हे साहित्य विद्यापीठ प्रशासनाकडे सुपूर्द केले.शिवाजी विद्यापीठातील संग्रहाचे काम सध्या सुरू आहे. हे संग्रहाचे काम पूर्ण होताच चंद्रकांत मांडरे यांच्यावर अभ्यास करून या साहित्यांची मांडणी या ठिकाणी केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

 

माझ्या आजोबाचा हा अनमोल ठेवा यापुढे शिवाजी विद्यापीठातील संग्रहात जतन केला जाणार आहे. याचे मला व माझ्या आजीला यांचे समाधान वाटते, हे साहित्य जसेच्या तसे आम्हाला पुणे महानगर पालिकेचे महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव यांनी परत देण्यासाठी विशेष मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे.- स्वरूपा मांढरे - पोरे 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर