शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

‘हर हर महादेव’च्या गजरात टिकाव..

By admin | Updated: April 8, 2017 21:43 IST

माण तालुका : पहिल्या दिवशी १५ हजारांवर ग्रामस्थांचे वॉटर कप स्पर्धेअंतर्गत श्रमदान

दहिवडी : माण तालुक्यात शनिवारी वॉटर कप स्पर्धा-२ सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १५ हजारांचा आकडा पार करीत लोकांनी उत्साहात श्रमदान केले. राजवडी ग्रामस्थांनी पहिला टिकाव ‘हर हर महादेव’च्या गजरात मध्यरात्री १२ वाजता मारला आणि कामाला सुरुवात केली, हे विशेष. माण तालुक्यातील एकूण ३२ गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. शनिवारी पहिलाच दिवस होता. पुरुष, महिला सकाळ-सकाळी लवकर घरचे काम आटोपून कामाच्या ठिकाणी पोहोचले. तर शिंगणापूरच्या महादेवाला वंदन करून मध्यरात्रीच्या १२ वाजता राजवडीमधील युवकांनी श्रमदानाला सुरुवात केली. मार्डी येथे फलटणवरून लोकांनी येऊन श्रमदान केले. तर पिंगळीमध्ये अभिषेक करून श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी ‘तुफान आलया’ या गाण्याच्या आवाजात श्रमदान केले गेले. माण तालुक्यात यात्रांचा हंगाम असूनही या ३२ गावांत पहिल्याच दिवशी १५ हजारांच्यावर लोकांनी श्रमदान केले. अनेक ठिकाणी लुज बोल्डर, सीसीटी बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येकी ८ या प्रमाणे प्रांताधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी ३२ गावे दत्तक घेतली आहेत. शनिवारी लोकांचा उत्साह वाढावा, यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी गोंदवले खुर्द, तहसीलदार सुरेखा माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली पोळ, सभापती रमेश पाटोळे यांनी पर्यंती येथे श्रमदान केले. दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी थदाळे येथे, गटविकास अधिकारी आर. जी. सांगळे यांनी कुळकजाई, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर यांनी कोळेवाडी येथे श्रमदान केले.पाणी समन्वयक अजित पवार मनकर्णवाडी, डॉ. प्रदीप पोळ शिरवली, डॉ. माधवराव पोळ, अलका पोळ, पांडुरंग पोळ यांनी मार्डी तर अनुराधा देशमुख, रवींद्र खोमणे यांनी लोधवडेत श्रमदान केले. शांतिगिरी महाराज, दादा जगदाळे यांनी परकंदीत तर माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी कुलाळ, तालुका शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ, अरुण गोरे, डॉ. संदीप पोळ यांनी बिदालमध्ये जाऊन श्रमदान केले. त्यामुळे लोकांचा उत्साह वाढला होता. शांतिगिरी महाराज जनसेवा प्रतिष्ठान, डॉ. संदीप पोळ, बबनशेठ वीरकर यांनी काही ठिकाणी मोफत साहित्याचे वाटप केले. अनेक गावांमध्ये मुंबईकर पुणेकर मंडळी श्रमदानासाठी दाखल झाली आहेत. शनिवारी कुळकजाई ५८०, परकंदी ३१०, शिरवली २०० , श्रीपालवण २०५, कोळेवाडी १००, स्वरुपखानवाडी ३२५, पिंगळी ३५०, गोंदवले ८०, लोधवडे १२००, जाशी ६४०, वाकी २७५, पर्यंती ६०५, कारखेल ५५०, किरकसाल ६७५, मनकर्णवाडी १२५, अनभुलेवाडी ३१०, शेवरी २५, इंजबाव ३१०, खुंटबाव २८५, मार्डी ५७५, बिदाल २०००, पांगरी २०५, राजवडी १५० लोकांनी श्रमदान केले. त्याचबरोबर मोगराळे, दानवलेवाडी, थदाळे सोकासन, पिंगळी, शिंदी गावानेही श्रमदान केले. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. (प्रतिनिधी) बिदालचे अनोखे नियोजन...अनेक गावाने कामाचे नियोजन केले होते. विशेषत: बिदालने मुख्य ठिकाणी भोंगे बसवले होते. शनिवरी पहिला भोंगा पहाटे ५.३० चा झाला. त्यानंतर लोक उठून घरगुती कामे करू लागले. दुसरा भोंगा ६:३० वाजता झाला. त्यामुळे सर्वांचीच कामाच्या ठिकाणी निघण्याची तयारी झाली. तिसऱ्या ६ : ४५ च्या भोंग्याला लोक जमले. चौथा ७ चा भोंगा झाला आणि लोक कामाला लागले. दरम्यान, सकाळी ६ ते ९ या कालावधीमध्ये काही गावांतील दुकाने बंद ठेवली होती. काही गावांत पाणीपुरवठा हा सकाळऐवजी सायंकाळी करण्यात आला होता. आज सहभाग आणखी वाढणार...गेली १ महिना प्रशासकीय अधिकारी, समन्वय समिती यांनी भाग घेतलेल्या गावात ग्रामसभा घेऊन जनजागृती केली होती. तर दुसरीकडे आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून डॉ. माधवराव पोळ, डॉ. अलका पोळ यांनी नवचेतना शिबिरे घेऊन लोकांचा उत्साह वाढवला होता. तर ३२ गावांतील लोकांनी सर्व राजकीय मतभेद विसरून श्रमदान केल्याने पहिल्याच दिवशी १५ हजार लोकांनी श्रमदान केले. रविवार सुटीचा दिवस असल्याने आणखी लोकसहभाग वाढण्याची शक्यता आहे.