शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला सर्वेक्षणातील चित्र : शहरातील ७५२ फेरीवाले अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:21 IST

कोल्हापूर महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे केला असून, याची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ४ हजार १०९ फेरीवाल्यांपैकी तब्बल ७५२ फेरीवाले अपात्र ठरले आहेत. या अपात्र फेरीवाल्यांसह ज्यांचा सर्व्हे झालेला नाही, अशांना महिन्याची मुदत दिली आहे. यानंतर मात्र, संबंधितांवर कारवाई होणार आहे.

ठळक मुद्दे फेरीवाला सर्वेक्षणातील चित्र : शहरातील ७५२ फेरीवाले अपात्रकागदपत्रे जमा करण्यासाठी महिन्याची मुदत

कोल्हापूर : महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे केला असून, याची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ४ हजार १०९ फेरीवाल्यांपैकी तब्बल ७५२ फेरीवाले अपात्र ठरले आहेत. या अपात्र फेरीवाल्यांसह ज्यांचा सर्व्हे झालेला नाही, अशांना महिन्याची मुदत दिली आहे. यानंतर मात्र, संबंधितांवर कारवाई होणार आहे.कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांना शिस्त लावण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या इस्टेट विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. ४१०९ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. फेरीवाल्यांच्या समितीच्या बैठकीनंतर इस्टेट विभागाने या फेरीवाल्यांची महापालिकेच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध केली आहे.

यामध्ये पात्र, अपात्र फेरीवाल्यांचा समावेश आहे. अपुरी कागदपत्रे देणाऱ्या ७५२ फेरीवाल्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. महिन्यानंतर फेरीवाला समितीसमोर अंतिम फेरीवाला यादी करण्यात येणार आहे. त्यानंतर फेरीवाला झोन निश्चित होणार आहे.

सर्व्हेत अपात्र ठरलेले फेरीवाले तसेच ज्यांचा सर्व्हेच झाला नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रासह इस्टेट विभागाशी संपर्क साधवा. या कामासाठी केवळ महिन्याची मुदत आहे. यानंतर पाच वर्षे सर्व्हे होणार नाही. त्यामुळे नोंद न होणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाणार आहे.सचिन जाधव, इस्टेट अधिकारी

सर्व्हे करणारी कंपनी-

  • आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट
  • सर्व्हे सुरू - १५ जानेवारी-२०१९
  • सर्व्हे केलेले फेरीवाले- ४१०९
  • सर्व्हेत पात्र ठरलेले फेरीवाले-३३५७
  • अपात्र ठरलेले फेरीवाले- ७५२

आवश्यक कागदपत्र

  • रेशनकार्ड
  •  आधारकार्ड
  • दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर