शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचे १ डिसेंबरपासून सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:01 IST

कोल्हापूर शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण दि. १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत एका विशिष्ट अ‍ॅपद्वारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हा विषय नसून, शहरात किती फेरीवाले व्यवसाय करतात, याची माहिती गोळा करणे हा हेतू असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचे १ डिसेंबरपासून सर्वेक्षणशासनाच्या सूचनांनुसार महापालिकेचा निर्णय

कोल्हापूर : शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण दि. १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत एका विशिष्ट अ‍ॅपद्वारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हा विषय नसून, शहरात किती फेरीवाले व्यवसाय करतात, याची माहिती गोळा करणे हा हेतू असल्याचे सांगण्यात आले.केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व राज्य शासन पुरस्कृत राज्य नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. या अंतर्गत (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) महाराष्ट्र योजना २०१७ च्या अंमलबजावणीकरिता शहरातील सर्व विद्यमान सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल. त्याकरिता राज्य शासनातर्फे एक विशिष्ट मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.जेव्हा सर्वेक्षणाकरिता कर्मचारी फेरीवाल्यांकडे जातील तेव्हा फेरीवाल्यांकडे सर्वेक्षणावेळी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आधार कार्डशी त्यांचा मोबाईल क्रमांक जोडला गेलेला असला पाहिजे. त्याशिवाय हे सर्वेक्षण पूर्ण होणार नाही.

फेरीवाल्यांकडे अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, इत्यादी बाबी असणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांग असल्यास तसा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, एकल / विधवा प्रमाणपत्र (असल्यास) ते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावेळी कोणतीही अडचण येणार नाही, असे इस्टेट विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने २०१३ मध्ये शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. राज्य सरकारकडून अलीकडेच महापालिकेला एक पत्र आले असून, १ मे २०१४ ही तारीख आधारभूत धरून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर फेरीवाले पात्र-अपात्र ठरविले जाणार आहेत. १ मे २०१४ पूर्वीपासून व्यवसाय करीत असल्याचे पुरावे म्हणून रमा फी, बायोमेट्रिक कार्ड, इस्टेट विभागाच्या फीच्या पावत्या विचारात घेतल्या जाणार आहेत. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर