शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कासकरशी संबंध जोडण्याची घाई सुप्रिया सुळे यांची पोलिसांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:55 IST

कोल्हापूर : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केल्यानंतर त्याच्याशी राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांचा संबंध जोडण्याची पोलिसांनी घाईच केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केल्यानंतर त्याच्याशी राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांचा संबंध जोडण्याची पोलिसांनी घाईच केली. हा प्रसिद्धीचा स्टंट असून, पोलिसांनी पक्षावर आक्षेप घेण्यापूर्वी पुरावे गोळा करावेत, ते सादर करावेत व मगच कारवाई करावी. पक्षाचा एखादा नेता या कारवाईत दोषी आढळल्यास त्याच्यावर पक्षातर्फे कारवाई करू, असे या पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.शिवसेना सत्तेत असून आंदोलने करते, हा मोठा विनोदच असल्याची टीका सुळे यांनी केली व शिवसेनेचा ‘कन्फ्युज्ड पार्टी’ असाही उल्लेख केला. सेनेने एक तर सत्तेत राहावे अन्यथा सत्तेबाहेर पडून आंदोलने करावीत, असाही टोला त्यांनी मारला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत युवा संवाद यात्रेनिमित्त महाराष्टÑ दौरा सुरू आहे. राज्यात महिला सुरक्षा, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. हे रोखण्यासाठी पोलीस, समाजाने काम केले पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.सदाभाऊ! नको रे बाबा..कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नव्या पक्षाबाबत खासदार सुळे यांनी मौन पाळले. सदाभाऊंनी तुम्हाला एका समारंभातील भाषणात ‘बहीण’ संबोधले होते असे सांगताच, ‘सदाभाऊ! नको रे बाबा... मला सहा भाऊ आहेत तेवढेच बस्स...नवे नाते जोडण्याची इच्छा नाही,’ असे त्यांनी सांगितले.परप्रांतीयांना सवलतीराज्यात सलग पाच वर्षे स्थायिक झालेल्या परप्रांतीयांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, अशी राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका आहे. त्याबाबत संसदेत आवाज उठविणार असल्याचेही सुळे यांनी सांगितले.