शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

‘जीकेजी’वरील वर्चस्ववाद उफाळला

By admin | Updated: September 8, 2015 00:30 IST

दोन गट भिडले : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे धुमश्चक्री टळली

कोल्हापूर : गोखले कॉलेज परिसरात (जिकेजी) शनिवारी दोन गटांत हाणामारी झाली होती. त्याचे पडसाद सोमवारी सकाळी उमटले. मात्र, जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे दोन गटातील धुमश्चक्री पोलिसांनी वेळेवर येत रोखलीच शिवाय या तरुणांना लाठीचा प्रसाद देत ‘सळो की पळो’ करून सोडले. कॉलेजवर आमच्याच गटाचे वर्चस्व म्हणून जवाहरनगरातील आरसी गॅँगचा गट आणि परिसरातील एका नामांकित तालमीचे नाव घेणारा एक गट अशा दोन गटांत गेल्या कांही दिवसापासून धुसफूस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका गटातील तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या गटाने त्यावेळी या घटनेची फिर्याद पोलिसांत दाखल केली नाही. मात्र, याचे पडसाद सोमवारी उमटले. सोमवारी कॉलेज परिसरात एका गटाने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घ्यायचा व पुन्हा प्रतिस्पर्धी गटातील तरुणांना मारहाण करायची, असा डाव दोन्ही गटांनी केला होता. मात्र, तत्पूर्वीच कॉलेज परिसरात जमलेली गर्दी पाहून आणि त्यातील तरुणांचा रूद्रावतार पाहून जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी मोठ्या आवाजात लावलेल्या डॉल्बीविषयीही माहीती दिली. तत्काळ दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणांना पांगविण्यासाठी किरकोळ बळाचा वापर केल्याने तरुण वाट दिसेल त्या दिशेला पळत सुटले व मोठा अनर्थ टळला. गेले काही दिवस या परिसरात वर्चस्व कुणाचे यावरून दोन्ही गटांत वाद होत हाणामारी सुरू आहे. मात्र, पोलीस कोणतीच ठोस कारवाई करत नसल्याने दोन्ही गट अधिक आक्रमक होऊ लागले आहेत. पोलिसात फिर्याद न देता एकमेकाचे उट्टे काढण्याचे प्रकार होत असल्याने या परिसरात कायम तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी ही एकमेकाला टार्गेट करण्याचा या दोन्ही गटांचा डाव होता. या रोजच्याच हाणामाऱ्यांमुळे या परिसरातील शांतता भंग झाली असून पोलिसांनी या परिसरात कायम बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. तक्रारी वाढल्या पण ठोस कारवाई नाहीगोखले कॉलेजच्या बाहेर कॉलेजमधील विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरीलच तरुणांची गर्दी सध्या वाढत आहे. त्यामुळे परिसरात कधी गाड्यांची तोडफोड, तर कधी तरुणांना मारहाण केली जात आहे. त्यात दररोज अशा घटना घडत असतानाही पोलीस लक्ष देत नसल्याची तक्रार येथील अनेक नागरिकांनी केली आहे. दररोजच्या या मारामारी व दहशतीच्या वातावरणामुळे या कॉलेजच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्यांची भांडणे आहेत ते तरुण भागातील एका तालमीचे नाव वापरतात. त्यामुळे अनेकदा तालमीचे नावही बदनाम होत आहे. या मारामारीत कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. जी मंडळी दहीहंडी व अन्य कार्यक्रम या परिसरात भरविते. तेही आपली जबाबदारी झटकून बाजूला जातात. ज्या विद्यार्थ्यांचा या दोन गटांशी काहीही संबंध नाही, असे विद्यार्थी पोलिसांचा मार खातात.