शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुपरवायझर, जाग्या व्हा; साड्यांचे पैसे परत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:48 IST

साडी खरेदीसाठी आलेले पैसे दमदाटी करून काढून घेऊन कमी किमतीच्या, हलक्या प्रतीच्या साड्या माथी मारल्याने संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपुरीतील बालकल्याण प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. ‘सुपरवायझर, जाग्या व्हा, साड्यांचे पैसे परत करा,’ अशा घोषणा देत त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना जाब विचारला.

ठळक मुद्देसुपरवायझर, जाग्या व्हा; साड्यांचे पैसे परत करा!शहर प्रकल्प कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने

कोल्हापूर : साडी खरेदीसाठी आलेले पैसे दमदाटी करून काढून घेऊन कमी किमतीच्या, हलक्या प्रतीच्या साड्या माथी मारल्याने संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपुरीतील बालकल्याण प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. ‘सुपरवायझर, जाग्या व्हा, साड्यांचे पैसे परत करा,’ अशा घोषणा देत त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना जाब विचारला.कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या सुवर्णा तळेकर व अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक यांना निवेदन देताना ‘आमचे पैसे आम्हाला परत करा. आम्ही आमच्या पसंतीने साड्या घेऊ, तुम्ही फक्त रंग सांगा,’ असा आग्रह धरला. जर हे जमत नसेल तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करून साड्या खरेदी करा, असे सुचविले. याबाबत तातडीने निर्णय घ्या, नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही दिला.

पैसे खर्च करण्यासाठी आटापिटाप्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन साड्यांसाठी जूनमध्येच पैसे वर्ग करून खरेदी करावी असे शासन आदेश आहेत; तथापि आता मार्च सुरू झाल्यानंतर आलेले पैसे खर्च करण्यासाठी म्हणून सुपरवायझर व प्रकल्प अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ण वर्ष जुन्याच साड्यांवर काढावे लागले आहे.

शासन दोन साड्यांसाठी ८०० रुपये देते. ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावरच जमा होते; पण आपणच खरेदी केलेल्या साड्या घ्याव्यात, असा आग्रह सुपरवायझरनी धरला आहे. त्यातून या महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्याआधी ते आपल्याकडेच द्यावेत अशी अट घालून मग खात्यावर वर्ग केले गेले.

त्यानंतर हे पैसे काढून घेऊन परस्पर साड्या खरेदी केल्या गेल्या. यात काही सुपरवायझरनी हात मारला आहे, अशी चर्चा आहे. शहरात २०० अंगणवाड्यांमध्ये ५०० मदतनीस व सेविका कार्यरत आहेत. त्यांना प्रत्येकी ८०० याप्रमाणे चार लाख रुपये शासनाकडून आले आहेत.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर