शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

संडे हटके बातमी -- हात नसलेल्या हर्षदचा खेळात ‘हातखंडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 01:32 IST

कल्पना करा. आपल्याला जन्मत:च हात नसतील तर! हर्षद गोठणकरालाही जन्मत:च हात नाहीत. मात्र, तो हात नाहीत म्हणून रडत बसला नाही. आपले पाय चांगले आहेत ना, असे म्हणत तो आपले

ठळक मुद्दे मुंबईच्या अपंग तरुणाचा प्रेरणादायी प्रवास । पायावर अवलंबून : सर्व क्षेत्रात कर्तृत्व

प्रशांत कोडणीकर ।नृसिंहवाडी : कल्पना करा. आपल्याला जन्मत:च हात नसतील तर! हर्षद गोठणकरालाही जन्मत:च हात नाहीत. मात्र, तो हात नाहीत म्हणून रडत बसला नाही. आपले पाय चांगले आहेत ना, असे म्हणत तो आपले आयुष्य नुसते जगत नाही, तर जगणं आनंददायी कसे करता येईल, ते आपल्या कृतीतून दाखवतोय.

शंकर गोठणकर हे मुंबईतील कुर्ला येथे राहतात. रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १९९६ साली हर्षदचा जन्म झाला; पण या एकुलत्या मुलग्याला हात नव्हते. पण, हर्षद हाताविना सर्व करू लागला. त्याने शालेय शिक्षण कुर्ला येथे, तर सोमय्या कॉलेजमध्ये बी.कॉम. केले आहे. हातपाय धड असलेल्यांना जे जमणार नाही, ते सर्व हर्षदने आपल्या पायाने करून सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले आहे. त्याला खेळाची अत्यंत आवड असून फुटबॉल, कॅरम, पोहणे, आदी सर्व खेळ सामान्य माणसाला लाजवेल असे खेळतो. सुरेख चित्रेही पायानेच काढतो.त्याने कॅरम आणि फुटबॉल स्पर्धेत बक्षिसेही मिळविली आहेत. त्याच्या जीवनावर युट्यूबवर ‘सोपान : एक जिद्द’ ही लघुफिल्म असून, त्याला २०१५चा ‘झी गौरव’ पुरस्कार मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत त्याचा पायाने खेळलेला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. तो पाहून येथीलश्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने त्याला ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोलविले.नोकरीची गरजहर्षद प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतो. आतापर्यंतच्या प्रवासात त्याला शासनाची कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. तो एकुलता असल्याने यापुढे त्याच्यावर कुटुंंबाची जबाबदारी येणार आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला सरकारी नोकरी मिळण्याची आवश्यकता आहे. त्याला नोकरी देण्याची गरज आहे. याशिवाय सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला तर त्याचे भविष्य उज्ज्वल होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर