शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सूर्यकिरणे दुसऱ्यांदा देवीच्या मुखावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 04:28 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या यंदाच्या पर्वात दुसऱ्यांदा मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मुखावर पडली.

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या यंदाच्या पर्वात दुसऱ्यांदा मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मुखावर पडली. मंगळवारी सायंकाळी पाच वाजून ४८ मिनिटांनी किरणे देवीच्या मुखावर पडली. किरणोत्सवाच्या पाचव्या दिवशीही पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याने भाविकांसाठी ही विशेष पर्वणी ठरली.श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण व दक्षिणायन असे दोन किरणोत्सव सोहळे पार पडतात. दक्षिणायन किरणोत्सवाचा मंगळवारी पाचवा दिवस होता. या पर्वातील किरणोत्सव सोहळ्यात रविवारी पूर्ण क्षमतेने सूर्यकिरणे देवीच्या चेहºयावर पडली होती. त्यानंतर पुढील दोन दिवसांत किरणांचा परतीचा प्रवास सुरू होऊन किरणे कमरेपर्यंत आणि शेवटच्या दिवशी चरणापर्यंत येऊन हा सोहळा संपतो.मंगळवारी सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी गरुडमंडपात आलेली किरणे पुढचे सगळे टप्पे पार करीत पाच वाजून ४८ मिनिटांनी देवीच्या चेहºयावर आली. अनपेक्षितपणे झालेला हा सोहळा उपस्थित भाविकांसाठी पर्वणीचा ठरला. या वेळी भाविकांनी ‘अंबा माता की जय!’चा गजर केला. पूर्वी किरणोत्सव पाच दिवस साजरा होत होता. मात्र अडथळे आले आणि किरणोत्सव तीन दिवसांचा झाला. गतवर्षी मात्र अभ्यासकांनी मांडलेल्या निष्कर्षानंतर देवस्थान समितीने किरणोत्सव पाच दिवसांचा असेल असे घोषित केले. मंगळवारी अखेरच्या दिवशी पूर्ण क्षमतेने झालेल्या किरणोत्सवाने यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर