शिवप्रसाद हे हौसिंग सोसायटीत कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा वर्धमान चौक परिसरात वार्पिंगचा व्यवसाय आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कारखान्यातील लोखंडी अॅँगलला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबतची वर्दी मुकेश सेन यांनी दिली आहे.
तीन दिवसांपूर्वीच एका यंत्रमागधारकानेही नदी उडी घेऊन आत्महत्या केली होती. व्यवसायातील मंदी व कर्जबाजारीपणामुळे आर्थिक विंवचनेतून घडणाऱ्या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.