शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

विद्यापीठ कायद्याबाबत सुधारणा सुचवा

By admin | Updated: August 1, 2015 00:09 IST

बी. पी. साबळे : प्रस्तावित महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टबाबत कार्यशाळेत आवाहन

कोल्हापूर : प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा मसुदा अधिकाधिक लवचिक व पारदर्र्शी होण्याच्या दृष्टीने त्रयस्थ भूमिकेतून सर्व संबंधित घटकांनी अभ्यास करून दुरुस्ती, सुधारणा सुचवाव्यात, असे आवाहन विद्यापीठ कायद्याचे अभ्यासक डॉ. बी. पी. साबळे यांनी शुक्रवारी येथे केले.प्रस्तावित महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिर्टी अ‍ॅक्टबाबत चर्चा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी परीक्षा नियंत्रक जी. आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कोंगळे प्रमुख उपस्थित होते.डॉ. साबळे म्हणाले, उपलब्ध विविध कायद्यांचा अभ्यास करून नूतन कायदा तयार केला आहे. कायद्याचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला, त्या दरम्यानच्या काळात केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान राबविण्यास सुरुवात झाली. त्याचा समावेश प्रस्तावित कायद्यात व्हावा. राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी एकच परीक्षा मंडळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सर्व घटकांनी त्रयस्थ भूमिकेतून प्रस्तावित कायद्याचा अभ्यास करावा व शैक्षणिक क्षेत्रासाठी भविष्यवेधी, लाभदायक कायदा निर्माण होण्यासाठी मौलिक सूचना कराव्यात. प्रा. जे. एफ. पाटील म्हणाले, प्रस्तावित कायद्यात निवडणुकांना फाटा देऊन नामनिर्देशनाचा मार्ग अवलंबला आहे. कायद्यात संचालकांची संख्या वाढविली असली तरी बीसीयूडी संचालकांचे पद मात्र यात उल्लेखित नाही. कुलगुरूंना सल्ला देण्यासाठी वैधानिक सल्लागार समिती नेमली आहे. त्यामुळे कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या की या समितीच्या सल्ल्याने काम करावे, असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिसभेमध्ये प्रत्येक संबंधित घटकाचे प्रतिनिधित्व दिसावे, अशी रचना करता येऊ शकेल का, याचाही विचार केला जाणे आवश्यक आहे.डॉ. मोरे म्हणाले, विधेयक तयार करताना शासनाने सांगोपांग विचार केला आहे. केवळ भारतातीलच नव्हे, पाश्चात्त्य देशांतील विद्यापीठे कायद्यांचाही अभ्यास बन्सल समितीसह सर्व समित्यांनी केल्याचे दिसून येते. त्यामुळे या कायद्यात सुधारणा सुचविताना अभ्यासपूर्ण पद्धतीनेच केल्या जाव्यात.कार्यशाळेत प्रा. सुधाकर मानकर, अमित कुलकर्र्णी, डॉ. वासंती रासम, प्रा. दीपक देशपांडे, विष्णू खाडे, वसंतराव मगदूम, श्वेता परुळेकर, डॉ. व्ही. बी. ककडे, विजय निकम, शंकरराव कुलकर्र्णी, एच. व्ही. देशपांडे, डॉ. नितीन सोनजे, शिवाजीराव परुळेकर, आनंद जरग, मिलिंद भोसले, शरद मिराशी, अजित इंगळे यांनी मते व्यक्त केली. यावेळी उपकुलसचिव संजय कुबल यांनी स्वागत केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)