शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

उर्वरित उसाला पहिली उचल २५०० रुपये साखरेचे दर घसरले : कोल्हापुरातील कारखानदारांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:32 IST

कोल्हापूर : तीन महिन्यांत साखरेचे दर कोसळल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी एफआरपी अधिक शंभर रुपये याप्रमाणे उसाची पहिली उचल देण्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने

कोल्हापूर : तीन महिन्यांत साखरेचे दर कोसळल्याने बॅँकांनी मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी एफआरपी अधिक शंभर रुपये याप्रमाणे उसाची पहिली उचल देण्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यासाठी उर्वरित उसाला प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत बुधवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये २२ सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी एकमताने हा निर्णय घेतला. यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजेच आॅक्टोबर महिन्यात घाऊक बाजारात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर होता. त्यानुसारच बॅँकांची उचल गृहित धरून एफआरपी अधिक शंभर रुपये पहिली उचल व त्यानंतर दोन महिन्यांत शंभर रुपये देण्याचा निर्णय झाला; पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण सुरू झाली.

तीन महिन्यांत साखरेचे दर ३६०० वरून २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी, बॅँकांचे मूल्यांकनही आपोआपच कमी झाले.बाजारभावाच्या ८५ टक्के उचल बॅँका देतात. त्यातून कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज तसेच साखर तयार करण्यासाठी येणारा प्रक्रिया खर्च व ‘एफआरपी’साठी घेतलेले मागील हंगामातील कर्जाचे हप्ते या सगळ्या कपाती वजा जाता ऊसदरासाठी केवळ १७७५ रुपये शिल्लक राहतात. यासह मोलॅसिस, बगॅस, प्रेसमडचे उत्पन्न मिळून २७६४ रुपयांपर्यंत रक्कम राहते. त्यातून सरासरी सहाशे रुपयांप्रमाणे तोडणी व ओढणी खर्च वजा जाता उसासाठी केवळ २१६४ रुपये उपलब्ध होतात. जाहीर दर व उपलब्ध होणारी रक्कम यांमध्ये मोठी तफावत आहे. त्यात बॅँका जादा उचल देण्यास तयार नसल्याने कारखानदार कोंडीत सापडले आहेत.

जाहीर केलेल्या दराप्रमाणे शेतकºयांना कोणत्याही परिस्थितीत पैसे दिले जातील; पण सध्या शेतकºयांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.बैठकीला संताजी घोरपडे कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ, ‘जवाहर’चे अध्यक्ष प्रकाश आवाडे, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, ‘आजरा’चे अध्यक्ष अशोक चराटी, ‘भोगावती’चे अध्यक्ष पी. एन. पाटील, ‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘राजाराम’चे पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.अशी आहे जिल्ह्यांतील उचलसोलापूर २१००पुणे २२००नागपूर २१००कोल्हापूर सरासरी २८०० (आतापर्यंत)