शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाना सभासद शेअरची किंमत वाढवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

राधानगरी : ऊस उत्पादकांना मिळणारी उसाची एफआरपी तीन टप्प्यात देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याला मोठा ...

राधानगरी : ऊस उत्पादकांना मिळणारी उसाची एफआरपी तीन टप्प्यात देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याला मोठा विरोध होण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांना साखर कारखान्याच्या माध्यमातून आणखी एक धक्का बसणार आहे. कारखान्यांनी आपल्या सभासदत्वासाठी भरावी लागणारी रक्कम दहा हजारांवरून पंधरा हजार केली आहे. यासाठी उपविधीत कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा विषय वार्षिक सभेत ठेवला आहे. यावरून सभा गाजण्याची शक्यता आहे.

कार्यक्षेत्रात शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना सहकारी साखर कारखान्याचे सभासद होता येते. त्यासाठी अगदी सुरुवातीला ५०० रुपये भरावे लागत होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार त्यात वेळोवेळी वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी ५ हजारांवरून थेट १० हजार अशी वाढ झाली. ज्यांचा ऊस जातो त्यांच्या बिलातून वाढीव रक्कम कापून घेण्यात आली. ज्यांचा ऊस जात नाही किंवा ज्यांनी ही रक्कम भरली नाही त्यांना मिळणारी सवलतीची साखर दिली जात नाही.

आर्थिक अडचणीतील कारखान्यांना उसाची किमत, खेळते भांडवल व अन्य दैनंदिन खर्चासाठी कर्ज काढल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. बँका कर्ज देताना स्वभांडवल पाहतात. राज्य शासनाने १५ मे २०२१ च्या पत्रानुसार कारखान्यांना भागभांडवलासाठी सभासदत्वाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सभासदांनी वार्षिक सभेत मंजुरी देणे आवश्यक असल्याने हे विषय सभेत ठेवले आहेत. भोगावती कारखान्याची सभा ३० सप्टेंबर रोजी होत असून, त्यात ८ नंबरला हा विषय आहे, तर छत्रपती राजाराम कारखान्याची सभा २९ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यात हा विषय ९ नंबरला आहे.

ठळक- संस्थेला होणाऱ्या नफ्यातून सभासदांना दरवर्षी लाभांश दिला जातो. संस्थात जास्तीत जास्त लाभांश देण्याची चढाओढ असते. मात्र मोठी उलाढाल असलेले साखर कारखाने कधीच नफ्यात येत नाहीत. सभासदांना देण्यात येणाऱ्या साखरेचा दरही अलीकडे १० ते २० रुपये असा केला आहे. त्यामुळे ही वाढ करण्याला मोठा विरोध होणार आहे.