शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

By admin | Updated: March 9, 2017 18:55 IST

संतप्त कर्मचाऱ्यांचा रस्ता रोको : काम बंद : नगरसेवकांची मध्यस्थी

महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

गंगावेश येथे अतिक्रमण काढताना घडला प्रकार

संतप्त कर्मचाऱ्यांचा रस्ता रोको : काम बंद : नगरसेवकांची मध्यस्थीकोल्हापूर : शहरातील गंगावेश परिसरात अतिक्रमणे काढायला गेलेल्या महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना नागरिकांनी बेदम मारहाण केली. यावेळी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. अनपेक्षित घडलेल्या प्रकारानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर पोलिस कारवाई करावी, या मागणीसाठी ‘काम बंद’ ठेऊन रास्ता रोको केला; परंतु पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाऊ नये म्हणून काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून मारहाण करण्याऱ्यांना माफी मागायला भाग पाडले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातर्फे गुरुवारी सकाळी पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेस परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. गंगावेश येथे किशोर आयरेकर यांच्या मालकीच्या बाबा वडा सेंटरच्या दुकानाचे पत्र्याचे शेड पाच ते सहा फुटांनी रस्त्यावर आले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर आलेले वाढीव बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली. त्यावेळी तेथील काही नागरिकांनी त्यास अटकाव केला. आम्ही शेड उतरून घेतो, मुदत द्या अशी त्यांनी विनंती केली; पण कर्मचाऱ्यांनी त्यांचे काही एक न ऐकता कारवाई सुरू केली. जेसीबी पुढे घालत पत्र्याचे शेड पाडले. त्याबरोबरच या दुकानाचे शटरसुद्धा खाली आले. त्यामुळे संतप्त झालेल्या आयरेकर कुटुंबीयांसह शेजारील नागरिकांनी जेसीबी चालक शंकर गामा मराडे यास खाली खेचून बेदम मारहाण केली. सोडवायला गेलेल्या उमेश वसंतराव मोहिते यांनाही त्यांनी जोरात मारहाण केली तर कनिष्ठ अभियंता रमेश कांबळे यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांना अपमानित करण्यात आले. अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने कर्मचारी गोंधळून गेले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती कळविली. त्यावेळी सहायक आयुक्त सचिन खाडे, संजय भोसले, नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत त्याठिकाणी पोहोचले. तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी गंगावेशीतच ‘काम बंद’ ठेऊन रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. सहाय्यक आयुक्त खाडे व नेत्रदीप सरनोबत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झालेली असून अश्लील शिवीगाळही करण्यात आली असून आधी मारहाण करणाऱ्यांवर पोलिस कारवाई झाली पाहिजे, असा आग्रह धरला. रस्ता रोको सुरू असतानाच विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी तेथे आले. सुरुवातीस त्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेण्याऐवजी दुकानमालकाचीच बाजू घेतली. त्यामुळे कर्मचारी अधिकच संतप्त झाले. ------------------------------------------------------पदाधिकारी, नगरसेवकांची मध्यस्थी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आयरेकर यांना ‘शेड उतरण्यासाठी अवधी द्या, ते उतरून घेतील’ असेही त्यांनी सांगितले; पण कर्मचारी आधी त्यांच्यावर पोलिस कारवाई झाली पाहिजे, असा आग्रह धरत होते. त्यावेळी गवंडी यांनी ‘तुम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करणार, मग ते तुमच्यावर गुन्हा नोंद करणार’ त्यातून वाद वाढत जाईल तेव्हा कारवाईचा विषय लांबवू नका शेड ते स्वत: उतरून घेत आहेत, असे सांगितले. त्यात सहायक आयुक्त खाडे, भोसले यांनीही कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा विषय फारसा गांभीर्याने घेतला नाही. त्यावेळी कर्मचारी नाराज झाले. ‘अतिक्रमण काढा म्हणून तुम्हीच सांगता आणि आता मारहाण झाल्यावर परत तुम्हीच विषय सोडून द्या, असे म्हणता हे बरोबर नाही,’ अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी नाराजी बोलून दाखविली. अधिकाऱ्यांनाही त्यांनी खडसावले. आमच्या मागे कोणीच उभे राहणार नसेल तर मग कारवाई तरी का करावी? अशा हताश भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. -------------------------------------------------------घटनास्थळी गर्दी, तणावअतिक्रमण काढतेवेळी झालेल्या मारहाणीवेळी अचानक कर्मचाऱ्यांना ‘काम बंद’ करून रस्ता रोको केला. त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी जमली. वाहतूकही विस्कळीत झाली. वातावरण तणावपूर्ण बनले नंतर पोलिस कुमक मागविण्यात आली; परंतु झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला नाही.