शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांसाठी समाजातून मदतीचा ओघ कायम- विठलाईवाडा धनगरवाड्यातील दारिद्र्याशी झगडत असलेले वरक कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:49 IST

शित्तूर-वारूण : शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील विठलाईवाडा धनगरवाड्यावरील दारिद्र्याशी झगडत असलेल्या वरक कुटुंबाच्या तीन चिमुकल्यांच्या मदतीसाठी

ठळक मुद्देशैक्षणिक साहित्य, धान्य, रोख रक्कम :

शित्तूर-वारूण : शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील विठलाईवाडा धनगरवाड्यावरील दारिद्र्याशी झगडत असलेल्या वरक कुटुंबाच्या तीन चिमुकल्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह शैक्षणिक साहित्य, धान्य, आरोग्यसेवा अशा स्वरूपात अनेकांकडून या कुटुंबास आधार मिळत आहे.

मणक्याच्या आजाराने ग्रस्त वडील व कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत असलेली आई असून, नसल्यासारखी असलेली ही निराधार मुले मोडकळीस आलेल्या घरात दारिद्र्याच्या वेदना सोसत असल्याची व कुटुंबालामायेच्या आधाराची, आर्थिकमदतीची गरज असल्याची माहिती समाजासमोर ‘लोकमत’ने गुरुवार(दि. २२) च्या अंकात ‘दारिद्र्याशी झगडणाºया चिमुकल्यांना हवाय आधार’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते.या वृत्तामुळे महाराष्ट्रातील कानाकोपºयांतून अनेकांनी वरक दाम्पत्य व मुलांची भेट घेतली. या चिमुकल्यांचे संगोपन, शिक्षण व वरक दाम्पत्यांच्या उपचारासाठी अनेकजण मदतीचा हात देत आहेत. ‘लोकमत’मधील वृत्तामुळेच बयाबाई वरक यांच्या कॅन्सरसारखा दुर्धर आजारावर आवश्यक असलेले उपचार व या कुटुंबातील चिमुकल्यांचे दारिद्र्यामुळे होत असलेले हाल समजल्याने आॅल इंडिया धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी सोमवारी या मुलांची भेट घेतली. या कुटुंबास आर्थिक मदत करीत यापुढेया मुलांच्या शैक्षणिक खर्चाचीसर्व जबाबदारी आपण स्वत:घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नाव जाहीर न करता मदततळंदगे येथील मोरया ग्रुपचे अध्यक्ष कुमार पवार, उपाध्यक्ष दिलीप कुंभार व ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विठल वरख यांच्या कुटुंबास धान्य व आर्थिक मदत केली. कोल्हापूर येथील राजकुमार पवार यांनीही मुलांच्यासाठी खाऊ, कपडे याचबरोबर कुटुंबास आर्थिक मदत केली. वसगडे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार यांनीही या कुटुंबास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. बयाबाई वरक यांना कोल्हापूर येथील कॅन्सर हॉस्पिटलमधून घरी येण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था नावाचा उल्लेख न करू इच्छिणाºया एका दातृत्ववानाने केली.