शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दैवज्ञ बोर्डिंगमध्ये ‘सत्तारूढ‘ची बाजी, अध्यक्षपदी सुधाकर पेडणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:58 IST

कोल्हापूर येथील दैवज्ञ बोर्डिंगच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये सत्तारूढ दैवज्ञ विश्वकर्मा सत्तारूढ पॅनेलने १९ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली आहे. विरोधी दैवज्ञ तिरूपती बालाजी पॅनेलने आठ जागा जिंकत जबरदस्त लढत दिली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढचे सुधाकर पेडणेकर यांनी विरोधी दिलीप ऊर्फ चंद्रकांत चोडणकर यांचा १८ मतांनी पराभव केला. सकाळी नऊपासूनच मतदानाला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देदैवज्ञ बोर्डिंगमध्ये ‘सत्तारूढ‘ची बाजी, अध्यक्षपदी सुधाकर पेडणेकरविरोधकांचीही अटीतटीची लढत

कोल्हापूर : येथील दैवज्ञ बोर्डिंगच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये सत्तारूढ दैवज्ञ विश्वकर्मा सत्तारूढ पॅनेलने १९ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली आहे. विरोधी दैवज्ञ तिरूपती बालाजी पॅनेलने आठ जागा जिंकत जबरदस्त लढत दिली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढचे सुधाकर पेडणेकर यांनी विरोधी दिलीप ऊर्फ चंद्रकांत चोडणकर यांचा १८ मतांनी पराभव केला.सकाळी नऊपासूनच मतदानाला प्रारंभ झाला.

१८०० पैकी १११८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बोर्डिंगच्या दोन्ही बाजूंना दोन्ही पॅनेलचे उमेदवार उभे राहून मतदारांना आवाहन करीत होते. दुपारी चारपर्यंत ५७ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.पदाधिकाऱ्यांच्या सहा पदांपैकी चार जागा सत्तारूढ पॅनेलने जिंकल्या; तर दोन जागांवर विरोधकांचे उमेदवार विजयी झाले. खालील १३ जागांपैकी सत्तारूढच्या सात, तर विरोधकांच्या सहा जागांवर उमेदवार विजयी झाले. हा निकाल जाहीर झाला. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सुपरिटेंडेंट या पदांसाठी फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी असीफ शेख यांनी रात्री नऊ वाजता निकाल जाहीर केला. निकालानंतर सत्तारूढच्या समर्थकांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.विजयी उमेदवार खालीलप्रमाणे, कंसात मतेअध्यक्ष- सुधाकर पेडणेकर (सत्तारूढ, ५५४),उपाध्यक्ष- मधुकर पेडणेकर (विरोधी ५४८), सेक्रेटरी विजय घारे (सत्तारूढ ५६१), उपसेक्रेटरी-श्रीकांत कारेकर (सत्तारूढ ५६८), खजानिस- श्रीराम भुर्के (विरोधी ५५४), सुपरिंटेंडेंट -प्रभाकर अणवेकर (सत्तारूढ ५४४, केवळ एक मताने विजयी)विजयी समिती सदस्य

  • सत्तारूढ

पद्माकर नार्वेकर (५५७), गजानन नागवेकर (५५४), प्रवीण मालवणकर (५४६), संजय कारेकर (५३३), शेखर पाटगावकर (५१६), गजानन भुर्के (५१०), रत्नाकर नागवेकर (५०६).

  • विरोधी

मुरलीधर मसूरकर (५८८), एकनाथ चोडणकर (५६८), सुनील बेळेकर (५४०), महेश पोतदार (५३६), किशोर कारेकर (५१४), महेश जामसांडेकर (५०४).विरोधी मसूरकरांना सर्वाधिक मतेसमिती सदस्यांमधून निवडून आलेले विरोधी आघाडीचे मुरलीधर मसूरकर यांना सर्वाधिक म्हणजे ५८८ मते मिळाली. या निवडणुकीत मते मोठ्या प्रमाणावर बाद झाल्याचे दिसून आले.

सभासदांनी ज्या विश्वासाने आम्हांला निवडून दिले आहे, त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही यापुढील काळात दैवज्ञ बोर्डिंगचा कारभार करू.सुधाकर पेडणेकरनूतन अध्यक्ष, दैवज्ञ बोर्डिंग

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर