शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'मुश्रीफ यांचे खंदे कार्यकर्ते गणपतराव फराकटे यांचे आकस्मिक निधन

By विश्वास पाटील | Updated: August 24, 2024 22:19 IST

मंत्री मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणुकीत दोनवेळा त्यांनी दिलेल्या मताधिख्याचा मोठा वाटा होता..त्यामुळे मुश्रीफ यांचाही राजकीय आधार त्यांच्या निधनाने निखळला. 

रमेश वारके

बोरवडे : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, बोरवडे गावचे माजी सरपंच आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक गणपतराव गुंडू फराकटे  ( वय ६५ ) यांचे शनिवारी रात्री ७ वाजता अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे. अंत्यसंस्कार उद्या रविवारी सकाळी ८.३० वाजता बोरवडे येथे करण्यात येणार आहेत. मंत्री मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणुकीत दोनवेळा त्यांनी दिलेल्या मताधिख्याचा मोठा वाटा होता..त्यामुळे मुश्रीफ यांचाही राजकीय आधार त्यांच्या निधनाने निखळला. 

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांचे ते वडील तर कागल पंचायत समितीच्या माजी सदस्या, माजी सरपंच शोभाताई फराकटे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.

ज्येष्ठ बंधू व बोरवडेचे तत्कालीन सरपंच  ज्ञानदेव गुंडू फराकटे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी १९८६ साली विठ्ठल सहकारी दूध संस्थेत संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. १९९० साली ते संस्थेचे अध्यक्ष झाले. तर १९९७ साली बोरवडे मतदारसंघातून निवडून येत ते सलग पाच वर्षे कागल पंचायत समितीचे उपसभापती होते.

बिद्री साखर कारखान्याचे ते २००५ ते आजअखेर संचालक आहेत. २००५ ते २००६ या कालावधीत त्यांनी बिद्रीचे उपाध्यक्षपद सांभाळले. डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीत विजयी झाल्यावर त्यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी संधी मिळाली.  बोरवडेचे पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणूनही २०१७ ला निवडून आले. पंचक्रोशीत त्यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबदबा होता..लोकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती होती..त्या बळावरच त्यांनी जनतेची नाळ कधी तुटू दिली नाही...