शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अशी ही भारतातील न्यायाची तऱ्हा

By admin | Updated: May 14, 2015 23:38 IST

सलमान खान आणि जयललिता यांच्या प्रकरणांनंतर दाऊद इब्राहीम यानं भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे; कारण देशातील उत्तम वकील नेमण्याएवढा

नरेंद्र रानडे - सांगली दिवसेंदिवस होत चाललेल्या गतिमान आयुष्यामुळे कित्येकांना स्वत:कडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. ‘मी आणि माझे’ हेच अनेकांचे भावविश्व बनल्याने विभक्त कुटुंबपध्दती अंगवळणी पडत चालली आहे. तरीही काहीजण एकत्र कुटुंब पध्दतीची संकल्पना प्रत्यक्षात जोपासत आहेत, तर दुसरीकडे विभक्त कुटुंबांमधील घटस्फोट, कौटुंबिक वादविवाद, नातेसंबंधात दुरावा यातही वाढ झाली आहे. वृध्द व्यक्ती अनेकांना ‘ओझे’ वाटत असल्याने कुपवाडच्या वृध्दाश्रमात प्रतीक्षा यादी लागली आहे. हे चित्र म्हणजे कौटुंबिक नातेसंबंधातील रेशीमबंध सैल होत चालल्याचे निदर्शक आहे. पूर्वीची वाडा संस्कृती अपार्टमेंटच्या जगात कालबाह्य झाली. साहजिकच एकत्र कुटुंबपध्दती लोप पावत चालली आहे. एकाच कुटुंबात १० ते १२ जण एकत्रित रहात असल्याचे चित्रही दिसेनासे झाले असून, सध्या बहुतांशी चौकोनी अथवा षटकोनी कुटुंबांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षातील आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अशा वाढत्या मर्यादित कुटुंबांच्या गर्दीतही जिल्ह्यात एकत्रित कुटुंबपद्धतीने राहणारे लोकही दिसून येत आहेत.पन्नासजणांचे एकत्रित कुटुंबप्रथमपासून आमच्या घरी एकत्र कुटुंब व्यवस्थेचे वातावरण होते. सध्या आमचा ५० जणांचा परिवार आहे. एकत्रित असल्यामुळे एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होता येते. मुख्य म्हणजे अनुभवी वयोवृध्द माणसांकडून मुलांवर लहानपणीच संस्कार होतात. याचा त्यांना जीवनाच्या पुढील वाटचालीत उपयोग होतो, असे वाळव्यातील निवृत्त माध्यमिक शिक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.२६ जणांचा परिवारसांगलीतील रामविश्वास दूध केंद्राचे चालक विवेक गवळी म्हणाले की, एकत्र कुटुंब पध्दती ही संकल्पना सर्वांनी स्वीकारली पाहिजे. सध्या आम्ही कुटुंबातील २६ जण एकत्रित राहतो. यामुळे आमच्यातील संवादात भर पडली आहे. जेवण, टीव्ही पाहणे आम्ही एकत्रितच करतो. महागाई वाढत असली तरी, एकत्र कुटुंब पध्दतीमुळे त्याचा भार आमच्यावर पडत नाही. कौटुंबिक कलहातही होत आहे वाढ....कौटुंबिक कलहातही वाढ होत आहे. शहरात असलेल्या महिला व मुले सहाय्य कक्षात महिन्याला कौटुंबिक वादविवादाच्या ३५ ते ४० तक्रारी येत आहेत. तीच परिस्थिती पोलीस मुख्यालयातील महिला कक्षातील तक्रारींची आहे. जिल्हा न्यायालयात वर्षाला सरासरी ५५० घटस्फोटाची प्रकरणे प्रविष्ट होत असून, यामध्ये लग्न झाल्यानंतर एक ते दोन वर्षात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एकत्र कुटुंबपध्दती दुर्मीळ होत चालल्याने व घरात मार्गदर्शन करणाऱ्यांची उणीव जाणवत असल्याने घरातील वाद मिटविण्यासाठी काहीजण आमच्याकडे येतात. प्रामुख्याने सासू-सुनेमधील भांडण, कौटुंबिक हिंसाचार आदी प्रकरणांचा यामध्ये समावेश असतो. दिवसागणिक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. - राधिका सावंत आणि दत्तात्रय कोळी, समुपदेशक, महिला व मुले सहाय्य कक्ष, सांगलीविभक्त कुटुंब पध्दतीमुळे आजी-आजोबांचा मायेचा आधार गेला आहे. सध्या टीव्ही, फेसबुक, व्हॉटस्-अ‍ॅप या माध्यमातून एकतर्फी, निरर्थक देवाण-घेवाण सुरू आहे. आमच्याकडे येणारी बहुतांशी प्रकरणे पती-पत्नीमधील विसंवाद, पालक आणि पाल्यामधील वाढता दुरावा तसेच नवविवाहितांमधील वाढत्या घटस्फोटाची असतात.- डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली.घाई-गडबडीत आणि एकमेकांना पसंत नसतानादेखील लग्नाच्या बंधनात अडकल्याने वधू-वरांचे थोड्याच कालावधित एकमेकांशी पटत नाही. परिणामी विसंवाद, गैरसमज यामुळे काही महिन्यातच न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याकडे कल वाढत चालला आहे. कुटुंब व्यवस्था डळमळीत झाल्याचेच हे लक्षण आहे.- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली.