शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

असा जपला त्यांनी मैत्रीचा अनमोल धागा

By admin | Updated: August 3, 2015 00:39 IST

\‘बालकल्याण’ला भेट : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सामाजिक बांधीलकी

दीपक जाधव - कोल्हापूर -सर्व कॉलेज तरुण-तरुणी आॅगस्टच्या पहिल्या रविवारी एकमेकांना मैत्रीचा धागा अर्थात ‘फ्रेंडशिप डे’चा बँड बांधण्यात गुंतली होती. दुसरीकडे मात्र, काहीजणांनी बालकल्याण संकुल येथील मुलांबरोबर रविवारचा मैत्री दिवस साजरा केला. त्यामध्ये येथील मुलांना लागणाऱ्या वस्तू देऊन व त्यांच्याशी खरोखरची मैत्री करून हा धागा आणखी घट्ट केला. ‘फ्रेंडशिप डे’ अर्थात मैत्रीचा दिवस म्हणून आॅगस्ट महिन्यातील पहिला रविवार जगभरात साजरा करतात. त्यात कोल्हापुरातीलही तरुण-तरुणी कसे मागे राहतील. या दिवशी अनेकांनी नेहमीच्या कट्ट्यावर येत एकमेकांना मैत्रीचे धागे बांधले. त्यात मुलांनी, मुलींनीही हा धागा बांधला. यानिमित्त विविध हॉटेल्स, स्नॅक सेंटर फुल्ल होती. मात्र, डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या स्नेहल जोशी, सायली जोशी, मृणाल जोशी, मानसी विभूते, मयूरी चव्हाण, वृषाली चव्हाण, नेत्रा लोहार, श्वेता पाटील, शिवानी जाधव, गणेश पाटील, अर्शद इनामदार, सागर घाडगे, मनोज पाटील, विशाल पवार, दीपक गुरव, दुर्वांकुर संकपाळ, अनिकेत झेंडे, विराज शेवाळे, इरफान अब्दुलरहिमान, आकाश रावण, सिद्धी जरग, शंतनू यादव यांच्याबरोबरच महाराष्ट्र हायस्कूल, होलिक्रॉस स्कूल, संकेश्वर येथील निडसोशी इंजिनिअरिंग कॉलेज, आदी संस्थांतील विद्यार्थ्यांनी बालसंकुलातील मुला-मुलींबरोबर गप्पा मारत दिवस साजरा केला. या विद्यार्थ्यांनी संस्थेसाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तू भेट स्वरूपात दिल्या. त्यात काही मुलींनी लहान मुलींबरोबर सेल्फी काढून आपला आनंद द्विगुणीत केला. कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील बालकल्याण संकुलात रविवारी डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींनी भेट देत संस्थेतील मुलींबरोबर सेल्फी काढत आपला आनंद आणखी द्विगुणीत केला.