शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मायबापांच्या पाठबळानेच यशस्वी

By admin | Updated: July 1, 2015 00:41 IST

‘धागे जन्मांतरीचे’ : आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुजा पाटील, स्नेहांकिता वरुटेंनी उलगडले यशाचे गुपित

कोल्हापूर : लहानपणापासूनच खेळाचे असलेले वेड आणि आई-वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दार कामगिरी केली़ मुलांची मक्तेदारी असलेले खेळ आम्ही निवडले; पण सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर यशस्वी झालो, या शब्दांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अनुजा पाटील आणि वेटलिफ्टर स्नेहांकिता वरुटे यांनी आपल्या वडिलांना मंगळवारी सलाम केला़ निमित्त होते ‘लोकमत सखी मंच’तर्फे ‘फादर्स डे’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘धागे जन्मांतरीचे’ या कार्यक्रमाचे़ ़़ ‘वामाज सिल्क अ‍ॅँड सारीज’ या कार्यक्रमाचे प्रायोजक होते़ शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमात पिता आणि मुलगी यांच्या नात्यांमधील अनेक पदर परस्परांनी उलगडले़ अनुजा पाटील म्हणाल्या, वडील क्रिकेटपटू होते़ आठव्या वर्षापासून त्यांचे सामने पाहायला जात असल्यामुळे क्रिकेटची आवड निर्माण झाली़ वडिलांनीच बॅट धरायला शिकवली़ त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक मारली़ स्नेहांकिता वरुटे म्हणाल्या, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या खेळांमध्ये मी करिअर करावे, अशी माझ्या आईची इच्छा होती़ त्यामुळे क्रीडा क्षेत्रात आॅफ बिट करिअर निवडण्याचा निर्णय घेतला़ प्रयाग चिखली या माझ्या गावामध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार लहानपणी पाहिला़ तो पाहून घरी गेल्यानंतर माझाही सत्कार होण्यासाठी मला काय करावे लागेल, या प्रश्नावर ‘त्याला खूप कष्ट करावे लागतात,’ हा आईने दिलेला सल्ला मी आचरणात आणला़ आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने हिचे वडील अनिल माने म्हणाले, वयाच्या तिसऱ्या वर्षापासून रेश्माला कुस्तीचे धडे देण्यास प्रारंभ केला़ कोल्हापुरात घरोघरी कुस्ती माहीत आहे़ याचा लाभ आॅलिम्पिकमध्ये उठविण्यासाठी मी कष्ट घेतले़ मुलींसाठी अपारंपरिक क्रीडाक्षेत्र निवडल्यानंतर आजूबाजूचे लोक बोलायचे; पण त्याचा विचार केला नाही़ या क्षेत्रात त्यांचा कल आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रोत्साहन देत गेलो़ त्यांना मिळत असलेल्या यशामुळे प्रचंड समाधान लाभले, असे मत अरुण पाटील आणि आणि बाबासाहेब वरुटे यांनी व्यक्त केले़ सुरुवातीला अरुण पाटील, बाबासाहेब वरुटे आणि अनिल माने यांचा कोल्हापुरी लहरी फेटे बांधून गौरव करण्यात आला़ यानंतर गरीब विणकराच्या जीवनावरील ‘कांजीवरम्’ हा प्रियदर्शन दिग्दर्शित, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘सखीं’ना दाखविण्यात आला़ कार्यक्रमाच्या शेवटी ‘सखीं’साठी लकी ड्रॉ काढण्यात आला़ यावेळी ‘वामाज सिल्क अ‍ॅँड सारीज’तर्फे लकी ड्रॉमधील भाग्यवान तीन सखींना साड्या देण्यात आल्या़ (प्रतिनिधी)