शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लाल मातीतच आयुष्य यशस्वी, माथाडी कामगारांचा मेळावा : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:14 IST

कोल्हापूर : सोशल मीडियां मुळे तरुण थोडेसे दिशाहीन झाले असून, त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रवचनाबरोबरच लाल मातीची गरज आहे. लाल मातीतच आयुष्य यशस्वी करण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.माथाडी कामगार युनियन, माथाडी पतसंस्थेच्या वतीने आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी शाहू मार्केट यार्ड येथे आयोजित गुणवंत कामगार ...

कोल्हापूर : सोशल मीडियांमुळे तरुण थोडेसे दिशाहीन झाले असून, त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रवचनाबरोबरच लाल मातीची गरज आहे. लाल मातीतच आयुष्य यशस्वी करण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

माथाडी कामगार युनियन, माथाडी पतसंस्थेच्या वतीने आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी शाहू मार्केट यार्ड येथे आयोजित गुणवंत कामगार सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील होते.

यावेळी पाठीवर पोते घेऊन दोनशे मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये निखिल पोवार (पोवारवाडी), तानाजी लव्हटे (शाहूवाडी), किसन खोत व महादेव खोत (खोतवाडी), संजय कात्रट (शाहूवाडी) यांनी क्रमांक पटकाविले. विजेत्यांसह गुणवंत माथाडी कामगारांचा गौरव खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, कुस्ती मैदानात ७२ चटकदार कुस्त्या झाल्या. यामध्ये नेत्रदीपक कुस्त्या करून मल्लांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी माथाडी कामगार नेते कृष्णात पाटील, बाजार समितीचे संचालक बाबूराव खोत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, परशराम खुडे, सुभाष जाधव, आदी उपस्थित होते.महिला कुस्तीगिरांचे मेमध्ये मैदानमाथाडी कामगारांनी कोणाच्या मदतीशिवाय आयोजित केलेल्या मैदानाचे कौतुक करत खासदार महाडिक म्हणाले, महिला कुस्तीगिरांना प्रोत्साहन देण्यासाठीमे महिन्यात खासबाग मैदानात कुस्त्यांचे आयोजन करणार आहे.