सांगली : येथील चिंतामणनगरमधील पलक मितुल प्रताप हिने पटाया (थायलंड) येथे झालेल्या रिले स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कास्य पदक मिळवले. रिले स्केटिंग फेडरेशन आॅफ इंडिया व आंतरराष्ट्रीय रोलर रिले वर्ल्ड फेडरेशनच्यावतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. फेडरेशनच्या अध्यक्ष मॉन्टी केन्ट यांनी तिचे विशेष क ौतुक केले. या स्पर्धेसाठी तिला प्रशिक्षक सुरज शिंदे, रोहिणी शिंदे, परविन शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. यापूर्वी पलक हिने नवी मुंबई, औरंगाबाद, गोवा, सांगली येथे झालेल्या स्पर्धेत यश मिळवले आहे. आजपर्यंत तिने स्केटिंग स्पर्धेत १५ सुवर्ण, सहा रजत, पाच कास्य पदकांची कमाई केली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा काँग्रेस सेवादलातर्फे क्रीडारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तिला व्यंकाप्पा बुरूड क्रीडा पुरस्कारही मिळाला आहे. ती येथील किडस् पॅराडाईज शाळेत दुसरीत शिकते. प्राचार्या निकिता भाटे यांचे प्रोत्साहन तिला मिळत आहे. (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय रोलररिले स्पर्धेत पलकचे यश
By admin | Updated: June 15, 2016 00:37 IST